15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वेगवेगळ्या पद्धतीने ध्वज फडकवला जातो, जाणून घ्या फरक..?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 06:34 PM2024-08-14T18:34:17+5:302024-08-14T18:34:46+5:30
Independence Day: 26 जानेवारी आणि 15 ऑग्स्ट रोजी तिरंगा फडकवला जातो, पण दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्याच्या पद्धत वेगळी आहे.
Independence Day : उद्या, 15 ऑगस्ट 2024 रोजी देशाचा 78वा स्वातंत्र्यदिन आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यातील फरक सांगणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील. तर, 26 जानेवारी रोजी देशाचे राष्ट्रपती कर्तव्यपथवर ध्वजारोहण करतात. विशेष म्हणजे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वेगळ्या पद्धतीने ध्वज फडकवला जातो. तुम्हालाही प्रश्न पडत असेल की, ध्वज फडकवण्यात वेगळे काय असू शकते?
दोन्ही पद्धतींची नावेही वेगळी...
15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी फडकवलेल्या ध्वजांची नावेदेखील भिन्न आहेत. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण करतात, ज्याला इंग्रजीत Flag Hoisting म्हणतात. तसेच, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात, ज्याला इंग्रजीत Flag Unfurling म्हणतात. म्हणजे 15 ऑगस्टला ध्वजारोहण आणि 26 जानेवारीला ध्वज फडकवला जातो.
दोन्हीमध्ये काय फरक..?
आता ध्वजारोहण आणि ध्वज फडकावणे, यातील फरक जाणून घेऊ. 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तेव्हा ध्वज खांबाच्या तळाशी असतो आणि पंतप्रधान दोरी ओढतात, तेव्हा तो हळुहळू वर जातो आणि फडकवला जातो. म्हणजेच, ध्वजारोहणात ध्वज खांबाच्या खालच्या वरच्या दिशेने सरकतो. हे लाल किल्ल्यावर घडते. हे राष्ट्रीय उत्थान, देशभक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. तर, 26 जानेवारीला ध्वज फडकवला जातो, तेव्हा ध्वज खांबाच्या वरच्या बाजूला बांधलेला असतो. राष्ट्रपती दोरी ओढतात आणि झेंडा हवेत फडकतो. हे आपल्या राज्यघटनेच्या तत्त्वांप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शवते.