Independence Day : 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 10:06 AM2019-08-15T10:06:41+5:302019-08-15T10:12:49+5:30
'कलम 370' संदर्भात मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं' असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे.
नवी दिल्ली - देशभरात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. गेल्याच आठवड्यात मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी तर बुधवारी संसदेत भाषण करताना भारताला थेट युद्धाची धमकी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 'कलम 370' संदर्भात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं' असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे. नव्या सरकारनं अवघ्या 10 आठवड्यांमध्ये 'कलम 370' , तिहेरी तलाकबद्दल महत्त्वाचे निर्णय घेतले असं ही म्हटलं आहे. तसेच 'कलम 370' करुन वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकारण्याकडे एक पाऊल टाकलं. जुन्या व्यवस्थेमुळे जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये भ्रष्टाचार वाढला असं ही मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं आहे.
PM Modi: We do not believe in creating problems or dragging them. In less than 70 days of our new Government, Article 370 was revoked, and in both Houses of Parliament, 2/3rd of the members supported this move. #IndiaIndependenceDaypic.twitter.com/yiwlTT4cfo
— ANI (@ANI) August 15, 2019
पंतप्रधान मोदींनी ''कलम 370' संदर्भात निर्णय घ्यावा असं सर्वांनाच वाटत होतं. अखेर केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेत निर्णय घेतला. लोकांनी दिलेलं काम करण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत' असं म्हटलं आहे. मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार मिळावा यासाठी तिहेरी तलाक रद्द केला. तिहेरी तलाक राजकीय निर्णय नव्हे, समानतेसाठी घेतलेला निर्णय असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच आम्ही समस्या टाळत नाही, आम्ही समस्या फार काळ ठेवतही नाही. व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे. वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या आहे. पायाभूत सोयीसुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मोदींनी दिली आहे.
We do not believe in creating problems or prolonging them.
— PMO India (@PMOIndia) August 15, 2019
In less than 70 days of the new Government, Article 370 has become history, and in both Houses of Parliament, 2/3rd of the members supported this step.
We want to serve Jammu, Kashmir, Ladakh: PM @narendramodi
लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचं मोदींनी म्हटलं. संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.
PM Narendra Modi: The new govt has not completed even 10 weeks, but in this short span of time in every sector we have taken important steps. #Article370 and 35A being revoked is a step towards realizing the dream of Sardar Patel . #IndiaIndependenceDaypic.twitter.com/Ve4RAxXBok
— ANI (@ANI) August 15, 2019
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचं काम असेल. सध्या जग वेगानं बदलत आहे. त्यामुळे भारताला तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करता येणार नाही. आपल्या सैन्य दलांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे तिन्ही दलांना वरिष्ठ पातळीवर एक प्रभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या चीफ ऑफ स्टाफ पद अस्तित्वात आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटीत तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असतो. यातील वरिष्ठ सदस्याकडे समितीचं चेअरमनपद दिलं जातं. चीफ ऑफ डिफेन्स पद निर्माण केलं जावं अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी हा मोठा निर्णय घेतला.
Delhi: Prime Minister Narendra Modi unfurls the tricolour at Red Fort. #IndiaIndependenceDaypic.twitter.com/FOzli5INJi
— ANI (@ANI) August 15, 2019
भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानवर मोदींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. जगात सध्या असुरक्षेचं वातावरण आहे. जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागावर चिंतेचं सावट आहे. काही भागातून दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. मात्र भारत अशा शक्तींविरोधात ठामपणे उभा आहे आणि यापुढेही राहील, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा खरा चेहरा आम्ही जगासमोर आणू. दहशतवाद्यांचा खात्माही करू. काहींनी केवळ भारतालाच नव्हे, तर बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंकेसारख्या देशातही दहशतवाद पसरवला आहे. या परिस्थितीत भारत शांत राहू शकत नाही. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा पदार्फाश करण्याचं काम भारत सुरूच ठेवेल, असंही मोदी म्हणाले.
Independence Day: मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची घोषणा; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार https://t.co/ooD9Az8NQs#IndependenceDay
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2019
Independence Day Live: मोदींकडून चीफ ऑफ डिफेन्स पदाची घोषणा; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार https://t.co/unMBghrGsC#IndependenceDay
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2019