Independence Day : स्वातंत्र्याच्या दोन दिवसआधी कसे होते चित्र, पाकिस्तानातून येत होत्या रक्ताने माखलेल्या रेल्वे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 05:44 PM2018-08-13T17:44:58+5:302018-08-13T17:48:18+5:30
बुधवारी भारतात ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सर्वांनाच हे माहीत आहे की, भारताला किती संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं.
नवी दिल्ली : बुधवारी भारतात ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सर्वांनाच हे माहीत आहे की, भारताला किती संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. पण यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासोबतच देशाची फाळणीही झाली होती. आणि या फाळणीच्या कितीतरी वेदनादायी कहाण्या आहेत. एका आकडेवारीनुसार विभाजनावेळी लाखों लोकांना मारले गेले होते.
धर्माच्या आधारावर केल्या गेलेल्या या विभाजनामुळे कोट्यवधी लोकांना आपल्या पुर्वजांची घरे सोडून दुसऱ्या जागेवर शरण घ्यावी लागली होती. असेही म्हटले जाते की, हे इतिहासातील सर्वात मोठं विस्थापन होतं. लाखो हिंदूंना पाकिस्तानातूनभारतात यावं लागलं होतं. यावेळी जो नरसंहान झाला तो अंगावर शहारे आणणारा होता. शिख आणि मुस्लिम एकमेकांचे शत्रू झाले होते.
जसेही देशाला दोन भागात विभागले गेले तसे हिंदू-मुस्लिम यांचंही विभाजन झालं. महिलांवर बलात्कार केले गेले आणि अनेकांची हत्या करण्यात आलीय. १३ ऑगस्ट १९४७ ला मुस्लिम महिला रेल्वेने पाकिस्तानला जाण्यास रवाना झाल्या होत्या. याचप्रकारे पाकिस्तानातून हिंदू महिला भारताकडे निघाल्या होत्या. दोन्हीकडून ज्या रेल्वे येत होत्या त्या मृतदेहांच्या ढिगाऱ्यांनी भरलेल्या होत्या.
एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष करण्याची तयारी सुरु होती तर दुसरीकडे रक्ताची होळी खेळली जात होती. जिकडे बघावं तिकडे केवळ मृतदेत दिसत होते.