चिकुनगुनियासाठी स्वतंत्र बेड
By admin | Published: September 17, 2016 03:02 AM2016-09-17T03:02:15+5:302016-09-17T03:02:15+5:30
नवी दिल्लीत चिकुनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दहा टक्के राखीव बेड असतील, अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी दिली.
नवी दिल्ली : नवी दिल्लीत चिकुनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दहा टक्के राखीव बेड असतील, अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत त्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली.
आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीत सरकारी रुग्णालयात चिकुनगुनिया व डेंग्यूूच्या रुग्णांसाठी एक हजार राखीव बेड ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेश आणि हरियाणातून दिल्लीत रुग्ण येत आहेत. त्यामुळे या राज्यांनी तेथेच क्लिनिक स्थापन करावे आणि या रुग्णांना दिल्लीत येऊ देऊ नये, असे आपण केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांना सुचविले आहे. डेंग्यू आणि चिकुनगुनियाला तोंड देण्यासाठी दिल्ली, उत्तरप्रदेश व हरियाणा सरकारला सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. डॉक्टर, औषधी, परीक्षण किट, प्रयोगशाळा आदी कुठल्याही गोष्टींची कमतरता नसल्याचे नड्डा यांनी सांंगितले.