अपक्ष नगरसेवक भाजपात

By admin | Published: January 26, 2016 12:05 AM2016-01-26T00:05:02+5:302016-01-26T00:05:02+5:30

(हॅलो १ बातमीत चौकट)

Independent corporator, BJP | अपक्ष नगरसेवक भाजपात

अपक्ष नगरसेवक भाजपात

Next
(ह
ॅलो १ बातमीत चौकट)
अपक्ष नगरसेवक भाजपात
आमदार जगवाणी यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी, एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत अपक्ष नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच माजी उपमहापौर व मनसेचे नगरसेवक मिलिंद कोंडू सपकाळे यांच्या पत्नी कविता सपकाळे, मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांचे बंधू सुनील नन्नवरे व मनसेच्या नगरसेविका मंगला चौधरी यांचे पती संजय (विठोबा) चौधरी यांनीही भाजपात प्रवेश केला.

शहरातील रस्त्यांसाठीही पाठविणार प्रस्ताव
सोमवारी सकाळी खाविआचे अध्यक्ष रमेशदादा जैन व महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्यात रमेशदादांनी शहरातील रस्त्यांसाठीही निधी मिळावा, अशी मागणी केली होती. त्यावर खडसे यांनी गडकरींशी चर्चा करून २००-३०० कोटी मिळवून देण्याचे मान्य केले. मनपाने ठराव करून द्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार मनपाकडून ठराव मंजूर करून दिला जाणार असल्याचे समजते.

Web Title: Independent corporator, BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.