अधिग्रहणासाठी स्वतंत्र व्यवस्था विचाराधीन - पर्रीकर
By Admin | Published: February 26, 2016 03:51 AM2016-02-26T03:51:33+5:302016-02-26T03:51:33+5:30
संरक्षण अधिग्रहणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत सरकार विचार करीत आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. फ्रान्ससारख्या अनेक देशांमध्ये संरक्षण अधिग्रहण
नवी दिल्ली : संरक्षण अधिग्रहणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत सरकार विचार करीत आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. फ्रान्ससारख्या अनेक देशांमध्ये संरक्षण अधिग्रहण हाताळण्यासाठी विशेष संस्था स्थापण्यात आल्या आहेत. संरक्षण खरेदी प्रक्रियेत बदल सुचविण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या धीरेंद्र सिंग कमिटीनेही अशा प्रकारची स्वतंत्र व्यवस्था करण्याची शिफारस केली होती. ‘भांडवली स्तरावर तसेच महसुली स्तरावर अशा प्रकारची स्वतंत्र संरक्षण अधिग्रहण व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करीत आहोत, असे पर्रीकर म्हणाले. नवी दिल्लीत गुरुवारी डीआयआयएचा शुभारंभ करताना ते बोलत होते. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणखी सहा महिने लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माहिती, ज्ञान व प्रयोगशीलता यात सातत्य असले पाहिजे. अधिकाऱ्यांची पदोन्नती सुनिश्चित करण्यासाठी पाऊल उचलले जाईल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)