Independence Day 2021 LIVE: "यही समय है, सही समय है, भारत का अनमोल समय है..." मोदींनी भारताच्या भविष्याबाबत जाहीर केला मोठा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 07:40 AM2021-08-15T07:40:08+5:302021-08-15T09:06:44+5:30

Independence Day 2021: देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून स्वातंत्र्य दिन सोहळ्यास सुरुवात केली आहे. 

India 15 Auguest 75th Independence Day 2021, pm narendra modi speech from red fort live updates | Independence Day 2021 LIVE: "यही समय है, सही समय है, भारत का अनमोल समय है..." मोदींनी भारताच्या भविष्याबाबत जाहीर केला मोठा संकल्प

Independence Day 2021 LIVE: "यही समय है, सही समय है, भारत का अनमोल समय है..." मोदींनी भारताच्या भविष्याबाबत जाहीर केला मोठा संकल्प

googlenewsNext

नवी दिल्ली - देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून स्वातंत्र्य दिन सोहळ्यास सुरुवात केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग आठव्या वर्षी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन केले आहे. तसेच आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

- यही समय है, सही समय है, भारत का अनमोल समय है...  कवितेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला भविष्यातील भारतासाठीचा संकल्प

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केली राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा 

- आज करत असलेले संकल्प देशाच्या १०० व्या स्वातंत्र्य दिनी सिद्ध होतील. त्यावेळी या लाल किल्ल्यावरून जे कुणी पंतप्रधान भाषण करतील. ते आज आपण करत असलेल्या संकल्पांची सिद्धता झाल्याचा उल्लेख करतील.

- दहशतवाद आणि विस्तारवाद हे भारतासमोरील मोठे आव्हान. भारत या दोन्ही आव्हानांचा प्रभावीपणे सामना करत आहे. देशाच्या लष्कराचे हात बळकट करण्यामध्ये आम्ही कुठलीही कुचराई करणार नाही, असा मी देशाच्या नागरिकांना विश्वास देतो

- नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची एक अजून महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये स्पोर्ट्सला एक्स्ट्रा करिक्युलर ऐवजी मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहे. जीवनात पुढे जायचे असेल तर त्यामध्ये क्रीडा हेसुद्धा महत्त्वाचे प्रभावी माध्यम आहे.

- आज देशाजवळ २१व्या शतकातील आवश्यकतांची पूर्तत करण्यासाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. गरीबांची मुले मुली मातृभाषेत शिकून प्रोफेशनल्स बनतील तेव्हा त्यांच्या सामर्थ्यासोबत न्याय होईल. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण गरिबीविरोधातील लढाईचे साधन असल्याचे मला वाटते.   

- देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही मिळणार प्रवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून केली मोठी घोषणा 

- भारत पुढच्या काही काळामध्ये प्रधानमंत्री गति शक्तीचा नॅशनल मास्टर प्लॅन देशासमोर ठेवणार आहे. १०० लाख कोटीपेक्षा अधिकच्या या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा असा मास्ट्र प्लॅन असेल, जो हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरची पायाभरणी करेल.
 

- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ आठवडे चालणाऱ्या कार्यक्रमांदरम्यान देशातील विविध भागांना ७५ वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून जोडणार 

- देशातील लहान शेतकरी हा देशाची शान ठरावा हे आमचे स्वप्न आहे.  येणाऱ्या वर्षांमध्ये देसातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीला अधिक वाढवावे लागेल. त्यांना अधिक सुविधा द्याव्या लागतील. 

- आता आपण सेचुरेशनच्या दिशेने गेले पाहिजे. सर्व गावांमध्ये रस्ते असावेत, सर्व कुटुंबांकडे बँक अकाऊंट असावेत. सर्व लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत कार्ड असावे, सर्व पात्र लाभार्थ्यांकडे उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन असावे. 

- २१ व्या शतकामध्ये भारताला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य आणि पूर्ण वापराची आवश्यकता आहे. त्यासाठी जे घटक, क्षेत्र मागे आहे त्यांची हँड होल्डिंग करणे आवश्यक आहे.

येथून पुढच्या २५ वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये आपल्या संकल्पांची सिद्धी आम्हाला स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल. 

कोरोनाविरोधाच्या लढाईत आम्ही सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत देशातील ५४ कोटी हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

विकासाच्या मार्गावरून चालत असतानाच देशासमोर कोरोनाचे संकट आले. देशवासियांनी संयम आणि धैर्याने संकटाचा सामना केला आहे.

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असतान फाळणीचे दु:ख देशवासियांच्या मनात ताजे आहे. त्यामुळे आमच्या सरकारने १४ ऑगस्ट हा विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशाला पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विशेष उल्लेख

भाषणाच्या सुरुवातील नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केले ध्वजवंदन

Web Title: India 15 Auguest 75th Independence Day 2021, pm narendra modi speech from red fort live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.