Independence Day 2021: राष्ट्रगीत गाताना तुमचा व्हिडीओ पाठवा, १५ ऑगस्टला TV वर लाईव्ह दिसणार; काय आहे केंद्र सरकारची योजना?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 08:54 AM2021-08-14T08:54:03+5:302021-08-14T08:54:34+5:30

Celebration 15th August 2021: My Gov India च्या अधिकृत यूट्यूब पेजने ‘लेट्स अस सिंग द नॅशनल एँथम’ शीर्षकाने एक व्हिडीओ बनवला आहे.

India 15 August 75th Independence Day 2021 Govt Invite People To Submit Videos Sing National Anthem | Independence Day 2021: राष्ट्रगीत गाताना तुमचा व्हिडीओ पाठवा, १५ ऑगस्टला TV वर लाईव्ह दिसणार; काय आहे केंद्र सरकारची योजना?

Independence Day 2021: राष्ट्रगीत गाताना तुमचा व्हिडीओ पाठवा, १५ ऑगस्टला TV वर लाईव्ह दिसणार; काय आहे केंद्र सरकारची योजना?

googlenewsNext

नवी दिल्ली – देशाचा स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीयासाठी उत्साहाचा दिवस असतो. यावर्षी भारतानं स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याला(Happy independence day 2021) ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारत सरकार यंदा स्वातंत्र्य दिनी काहीतरी स्पेशल करण्याची तयारी करत आहे. सरकारने यावर्षी स्वातंत्र्य दिन अमृत दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत सरकारने लोकांना विशेष राष्ट्रगीत गातानाचा एक व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन केले आहे.

राष्ट्रगीत गाताना व्हिडीओ करा अपलोड

My Gov India च्या अधिकृत यूट्यूब पेजने ‘लेट्स अस सिंग द नॅशनल एँथम’ शीर्षकाने एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यात सरकारने विस्तृत माहिती टप्प्याटप्प्याने दिली आहे. लोक या उपक्रमात कशारितीने भाग घेऊ शकतात हेदेखील सांगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ वैयक्तिक किंवा सामूहिक रेकॉर्ड करून अधिकृत वेबसाईट Rashtragaan.in यावर नोंदणी करून त्यावर तुमचा व्हिडीओ अपलोड करू शकता. वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रगीत गाताना रेकॉर्ड केलेला व्हिडीओ १५ ऑगस्ट २०२१ रोजी लाईव्ह प्रसारीत केला जाणार आहे.

तुमच्या भाषेत राष्ट्रगीत म्हणा

यात उपक्रमात भाग घेणाऱ्या लोकांनी स्वत:च्या मायबोलीत राष्ट्रगीत म्हणायचं आहे. आवडीच्या भाषेत राष्ट्रगीत म्हणण्याची संधी दिली आहे. एक फॉर्म भरल्यानंतर व्यक्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याचा व्हिडीओ अपलोड करू शकतात. प्रत्येक स्पर्धकाला प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक प्रमाणपत्र मिळणार आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, टीव्ही, रेडिओ, यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉन्च होणाऱ्या राष्ट्रगीताच्या टॉप १० व्हिडीओची निवड केली जाईल. त्यासोबत भारतीय ऑल्मपिक पदक विजेतेसह अनेक लोकप्रिय चेहरे एकत्र राष्ट्रगीत गातील आणि सर्वांना त्यांचा व्हिडीओ वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करतील.

कोरोना महामारीतही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह

केंद्र सरकारद्वारे असा उपक्रम घेण्यामागे उद्दिष्ट आहे की, भलेही कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. लोकं समुहाने एकमेकांना भेटू शकत नाहीत. सोशल डिस्टेसिंगचे पालन गरजेचे आहे. परंतु स्वातंत्र्य दिनाचा उत्साह भारतीयांच्या मनात कायम आहे. त्यामुळे त्याच उत्साहात आपण हटके पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे. यावेळी बहुतांश स्वातंत्र्य दिन कार्यक्रम ऑनलाइन माध्यमातून केले जातील. त्यामुळे भारतासाठी सर्वात मोठा दिवस जास्तीत जास्त लोकांच्या सहभागाने साजरा केला जाणार आहे.

पाहा व्हिडीओ - 

Web Title: India 15 August 75th Independence Day 2021 Govt Invite People To Submit Videos Sing National Anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.