NSGत भारताचा स्वीकार, तर पाकिस्तानला नकार?
By admin | Published: December 28, 2016 09:18 PM2016-12-28T21:18:10+5:302016-12-28T21:18:10+5:30
बऱ्याच काळापासून अणुपुरवठादार देशांच्या समुहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतासाठी या आघाडीवर यश मिळण्याची शक्यता आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - बऱ्याच काळापासून अणुपुरवठादार देशांच्या समुहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतासाठी या आघाडीवर यश मिळण्याची शक्यता आहे. एनएसजीमध्ये नव्या देशांना सदस्यत्व देण्यासाठी एक मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यात भारताला या समुहात सामील करून घेतानाच पाकिस्तानला बाहेर ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
द डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकास्थित युद्धसामुग्रीचे नियंत्रण करणाऱ्या आर्म्स कंट्रोल संघटनेनेने या बाबतचे वृत्त दिले आहे. मात्र नव्या देशांना नियमात सुट देऊन सदस्यत्व दिल्यास परमाणू अप्रसाराला नुकसान होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
एनएसजीचे माजी प्रमुख राफेल मारियाने यांनी तयार केलेल्या दोन पानी दस्तऐवजात अणु अप्रसार करारावर सही नसलेले भारत आणि पाकिस्तानसारखे देश एनएसजीचे सदस्यत्व कसे प्राप्त करू शकतात, याबाबत माहिती देण्यात आली आहे.