देशांतर्गत विमान वाहतुकीत भारत पुढेच
By admin | Published: March 9, 2017 12:26 AM2017-03-09T00:26:47+5:302017-03-09T00:26:47+5:30
भारताचे देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्र सलग २२ व्या महिन्यात जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाने (आयएटीए) ही माहिती दिली.
नवी दिल्ली : भारताचे देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्र सलग २२ व्या महिन्यात जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाने (आयएटीए) ही माहिती दिली.
‘आयएटीए’ने म्हटले की, भारतीय देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्र सलग २२ महिन्यात जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानी आहे. जानेवारीत भारताने २६.६ टक्के वृद्धीदर मिळविला. हा वृद्धीदर सलग १५ व्या महिन्यात २0 टक्क्यांपेक्षा जास्त ठरला. विमानांची उड्डाणे वाढल्यामुळे मागणीही वाढली आहे.
जागतिक पातळीवर देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रातील वाढीचा दर जानेवारीत ९९.९ टक्के राहिला. ब्राझिल वगळता जगातील सर्वच देशांत वृद्धी दिसून आली. चीन,
भारत आणि रशिया या देशांतील वृद्धीदर दोन अंकी राहिल्यामुळे जागतिक पातळीवरील वृद्धीला बळ मिळाले. चीनचा वृद्धीदर २३.२ टक्के राहिला.
‘आयएटीए’प्रमाणेच भारतीय विमान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेही (डीजीसीए) या क्षेत्रातील भारताच्या वृद्धीदराचे कौतुकास्पद आकडे जाहीर केले
आहे. डीजीसीएने जारी केलेल्या माहितीनुसार, २0१६ मध्ये ९.९
कोटी भारतीयांनी विमान प्रवास केला. आदल्या वर्षी हा आकडा ८.१
कोटी होता. याचाच अर्थ २0१६
मध्ये २३.२ टक्के वृद्धी नोंदली गेली.