‘इंडिया’ आघाडी ही देशासाठी ‘गंभीर धोका’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 07:32 AM2023-08-08T07:32:55+5:302023-08-08T07:35:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : स्वतःचे ‘इंडिया’ असे नामकरण करणाऱ्या विरोधी आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घणाघात ...

'India' alliance is a 'serious threat' to the country; Prime Minister Narendra Modi's criticism of the opposition | ‘इंडिया’ आघाडी ही देशासाठी ‘गंभीर धोका’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

‘इंडिया’ आघाडी ही देशासाठी ‘गंभीर धोका’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : स्वतःचे ‘इंडिया’ असे नामकरण करणाऱ्या विरोधी आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घणाघात केला. ही आघाडी देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या मार्गातील अडथळा असल्याचे ते म्हणाले. भारत एकसुरात भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगुलचालनाला ‘भारत छोडो’ (क्विट इंडिया) म्हणत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडी ‘इंडिया’वर हल्लाबोल करत ही आघाडी देशासाठी ‘गंभीर धोका’ असल्याचे म्हटले. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या समारंभात इंडिया पॅव्हेलियनमध्ये ते बोलत होते. ‘व्होकल फॉर लोकल’ ही आता लोकचळवळ बनली आहे, असे ते म्हणाले.

आता पुन्हा ‘क्विट 
इंडिया’ म्हणण्याची वेळ
n ९ ऑगस्टच्या समकालीन तत्त्वावर भर देताना मोदी म्हणाले की, ‘ही तारीख ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ हा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील भारताच्या सर्वात मोठ्या आंदोलनाची साक्षीदार आहे. 
n विकसित भारताच्या उभारणीत अडथळे निर्माण करणाऱ्या अशाच घटकांना दूर करण्यासाठी आता पुन्हा ही घोषणा देण्याची वेळ आली आहे. 
n काही घटक देश विकासात अडथळा आहेत. भारतातील ही दुष्प्रवृत्ती मोठे आव्हान असल्याचे सांगत देश त्यावर मात करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण भारत एकसुरात म्हणत आहे... भ्रष्टाचार, घराणेशाही, लांगुलचालन ‘भारत छोडो’, असेही ते म्हणाले.

Web Title: 'India' alliance is a 'serious threat' to the country; Prime Minister Narendra Modi's criticism of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.