जागावाटपाबाबत ममता बॅनर्जींनी भूमिका स्पष्ट, काँग्रेस समितीला भेटणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:45 PM2024-01-11T23:45:45+5:302024-01-11T23:52:17+5:30

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच बंगालमधील जागावाटपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

india alliance tmc will not meet congress committee mamata banerjee clear on congress seats in west bengal  | जागावाटपाबाबत ममता बॅनर्जींनी भूमिका स्पष्ट, काँग्रेस समितीला भेटणार नाही!

जागावाटपाबाबत ममता बॅनर्जींनी भूमिका स्पष्ट, काँग्रेस समितीला भेटणार नाही!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस जागावाटपाबाबत इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत सातत्याने बैठका घेत आहे. यादरम्यान, टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आघाडी समितीच्या सदस्यांना भेटण्यासाठी टीएमसी आपला प्रतिनिधी पाठवणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच बंगालमधील जागावाटपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, याचे कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांनी 2019 मध्ये जिंकलेल्या बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी फक्त त्या दोन जागा काँग्रेसला देण्याची ऑफर आधीच दिली होती.  दरम्यान, काँग्रेस आघाडी समितीने यापूर्वी दिल्लीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, आरजेडी, सपा यांच्या नेत्यांची भेट घेतली होती. तसेच, समिती येत्या काही दिवसांत टीएमसी आणि जेडीयूशी चर्चा करण्याचा विचार करत आहे. 

इंडिया आघाडीत सामील असलेल्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. त्याची सुरुवात 7 जानेवारीला बिहारमधून झाली. यानंतर 8 जानेवारीला काँग्रेस आणि आपमध्ये बैठक झाली. यानंतर 9 जानेवारीला महाराष्ट्रातील जागांवर चर्चा झाली. दार्जिलिंग, पुरुलिया आणि रायगंज या जागांसह मुर्शिदाबादमधील तीन आणि मालदामधील दोन जागांचा समावेश असलेल्या बंगालमध्ये काँग्रेस 8 जागांची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या आहेत. 

ममता बॅनर्जींना काँग्रेसला त्याच दोन जागा द्यायच्या आहेत, ज्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. काँग्रेसला बंगालमध्ये केवळ दोन जागा देण्यामागचे सर्वात मोठे कारण पक्षाची कामगिरी असू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी टीएमसीने 22 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या.

Web Title: india alliance tmc will not meet congress committee mamata banerjee clear on congress seats in west bengal 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.