जगातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात-जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:36 AM2020-07-29T05:36:34+5:302020-07-29T05:37:42+5:30
बुधवारी साजऱ्या होणाºया जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जावडेकर यांनी भारतातील वाघांविषयीचा ‘आॅल अबाऊट टायगर एस्टिमेशन २०१८’ या नावाचा एक अहवाल जारी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगात असलेल्या एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ आता एकट्या भारतात आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले की, भारतात सुमारे ३० हजार हत्ती आणि ५०० सिंहही आहेत.
बुधवारी साजऱ्या होणाºया जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जावडेकर यांनी भारतातील वाघांविषयीचा ‘आॅल अबाऊट टायगर एस्टिमेशन २०१८’ या नावाचा एक अहवाल जारी केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जावडेकर यांनी सांगितले की, १९७३ साली भारतात ९ व्याघ्र अभयारण्ये होती. त्यांची संख्या आता ५० झाली आहे. जगाच्या एकूण जमिनीपैकी फक्त २.५ टक्के जमीन भारतात आहे. मात्र, आपली जैवविविधता ८ टक्के आहे. जगातील फक्त १३ देशांत आता वाघ सापडतात. वाघांच्या संवधर्नासाठी काम करणाºया लोकांना प्रशिक्षण देण्यास भारत तयार आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे काही वर्षांपूर्वी वाघांचे वास्तव्य असलेल्या देशांच्या प्रमुखांची बैठक झाली होती. या बैठकीत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय झाला होता. याच बैठकीत २९ जुलै हा ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कॉर्बेट अभयारण्यात सर्वाधिक वाघ
अहवालातील माहितीनुसार, भारतातील वाघांपैकी सर्वाधिक २३१ वाघ कॉर्बेट अभयारण्यात आहेत. मात्र, मिझोरममधील डम्पा अभारण्य, प. बंगालमधील बक्सा अभयारण्य व झारखंडमधील पलामाऊ अभयारण्य या तीन अभयारण्यांत एकही वाघ उरलेला नाही. भारतात आढळणाºया एकूण वाघांपैकी ६५ टक्के म्हणजेच १,९२३ वाघ अभयारण्यात आहेत.