मेहुल चोकशीभोवती पाश आवळला, भारत आणि अँटिग्वामध्ये झाला प्रत्यार्पण करार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:56 PM2018-08-06T17:56:45+5:302018-08-06T20:25:50+5:30
देशाबाहेर पंजाब नॅशनल बँकेतील आरोपी मेहूल चोकशी याच्याभोवती भारतीय तपास यंत्रणांकडून पाश आवळण्यात आला आहे.
नवी दिल्ली - देशाबाहेर पळून अँटिग्वामध्ये आश्रय घेतलेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याच्याभोवती भारतीय तपास यंत्रणांकडून पाश आवळण्यात आला आहे. भारत आणि अँटिग्वाच्या सरकारमध्ये प्रत्यार्पण करार झाला असून, त्यामुळे मेहुल चोकसीला पुन्हा भारतात आणणे शक्य होणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आपल्याला अटक होऊ शकते याची कुणकुण लागताच मेहुल चोकशी देशाबाहेर पळून गेला होता. तसेच विविध देशांमध्ये लपूनशपून वास्तव्य करत अखेर त्याने अँटिग्वा या देशाचे नागरिकत्व मिळवले होते. त्याच्या अँटिग्वातील वास्तव्याची माहिती मिळाल्यानंतर भारत सरकारने त्याचा प्रत्यार्पणासाठी अँटिग्वामधील प्रशासनाबरोबर चर्चा सुरू केली होती.