भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन पायलट झाले शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:23 PM2019-09-27T16:23:33+5:302019-09-27T16:25:30+5:30
हवामान खराब असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी दिल्ली - भूतानमध्येभारतीय लष्कराचं चिताह हेलिकॉप्टर कोसळलं असून या दुर्घटनेत २ पायलट शहीद झाले आहेत. खेंतोन्गमानी, योन्फुला, त्राशीगंगजवळच्या टेकडीवर हा अपघात झाला असून जंगलग्रस्त भागात हेलिकॉप्टर कोसळल्याने बचावकार्यास अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.
भूतानमध्ये भारतीय सैन्याच्या चित्ता हेलिकॉप्टरचा हा अपघात झाला. या अपघातात दोन पायलट शहीद झाले. शहीद झालेला एक पायलट हा भारतीय लष्कराचा पायलट लेफ्टनंट कर्नल रँकचा होता तर दुसरा भूतानी सैन्याचा पायलट होता. हवामान खराब असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Indian Army sources: An Indian Army Cheetah helicopter crashed in Bhutan in which both the pilots lost their lives. The Indian Army pilot who died in the crash was of Lt Col (Lieutenant colonel) rank while the other was a Bhutanese Army pilot training with the Indian Army. pic.twitter.com/XzIROYne36
— ANI (@ANI) September 27, 2019