India China FaceOff: घुसखोरी रोखल्यानंतर भारतीय जवानांचा चीनला आणखी एक धक्का; ड्रॅगनचा तिसरा डोळा उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:04 PM2020-09-01T16:04:10+5:302020-09-01T16:10:55+5:30

India China FaceOff: चिनी सैन्याच्या कारवायांचा अंदाज घेत भारतीय जवानांनी ताब्यात घेतली ब्लॅक टॉप पोस्ट

india army removes chinese camera surveillance equipment from black top post | India China FaceOff: घुसखोरी रोखल्यानंतर भारतीय जवानांचा चीनला आणखी एक धक्का; ड्रॅगनचा तिसरा डोळा उद्ध्वस्त

India China FaceOff: घुसखोरी रोखल्यानंतर भारतीय जवानांचा चीनला आणखी एक धक्का; ड्रॅगनचा तिसरा डोळा उद्ध्वस्त

Next

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील तणाव चार महिन्यांपासून कायम असताना चीननं दोन दिवसांपूर्वी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चीनचे मनसुबे उधळून लावले. यासोबतच भारतानं ब्लॅक टॉप पोस्टवर कब्जा केला. ब्लॅक टॉप पोस्टचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पोस्टवर ताबा मिळवताच भारतानं चीनची टेहळणी यंत्रसामग्री आणि कॅमेरे हटवले.

२९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्यानं पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. १५ जूनलादेखील चीननं अशाच प्रकारे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्याचा अनुभव गाठिशी असल्यानं २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री भारतीय जवानांनी चीनचे मनसुबे उधळून लावले. विशेष म्हणजे ब्लॅक टॉप पोस्टवर चीनची टेहळणी यंत्रणा आणि कॅमेरे असूनही भारतीय जवानांनी चिनी सैन्याला मागे रेटलं. त्यामुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली पोस्ट भारतीयांच्या ताब्यात आली. 

...तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी 

ब्लॅक टॉप पोस्टवर कब्जा करताच भारतीय सैन्यानं तिथं लावण्यात आलेली टेहळणी सामग्री आणि कॅमेरे हटवले. ही पोस्ट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असून ती भारतीय हद्दीत येते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनची निगराणी यंत्रणा स्वयंचलित आहे. भारतीय जवानांच्या हालचाली टिपण्यासाठी पोस्टवर कॅमेरे आणि सेन्सर लावण्यात आले आहेत. ठाकुंगजवळ असलेल्या एका उंच चौकीवरूनही चिनी सैन्य भारतीय जवानांच्या हालचालींवर करडी नजर ठेवतं.

...अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिले

चिनी जवान उंचावरील पोस्टवर कब्जा करणार याचा अंदाज भारतीय जवानांनी बांधला होता. त्यामुळेच गेल्या आठवड्यात भारतीय सैन्याच्या विशेष ऑपरेशन युनिट आणि सिख लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी रणगाडाविरोधी तोफा डोंगराळ भागात उंचावर तैनात केल्या. विशेष ऑपरेशन युनिट कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास अतिशय सक्षम मानलं जातं.

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स' म्हणजे नेमकं आहे तरी काय? ज्यांच्यामुळे भारत-चीन आले 'आमने-सामने'

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

Web Title: india army removes chinese camera surveillance equipment from black top post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.