'Indian Variant' नावाच्या वापरावर सरकारची कठोर भूमिका, कंटेन्ट हटवण्याचे Social Media कंपन्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 11:21 AM2021-05-22T11:21:16+5:302021-05-22T11:23:02+5:30

Coronavirus : माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र. WHO नं 'Indian Variant' हा कोरोनाच्या B.1.617 ला जोडला नसल्याचं मंत्रालयानं केलं नमूद.

India asks social media firms to remove reference to Indian variant of coronavirus Who letter | 'Indian Variant' नावाच्या वापरावर सरकारची कठोर भूमिका, कंटेन्ट हटवण्याचे Social Media कंपन्यांना निर्देश

'Indian Variant' नावाच्या वापरावर सरकारची कठोर भूमिका, कंटेन्ट हटवण्याचे Social Media कंपन्यांना निर्देश

googlenewsNext
ठळक मुद्देमाहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र.WHO नं 'Indian Variant' हा कोरोनाच्या B.1.617 ला जोडला नसल्याचं मंत्रालयानं केलं नमूद.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संसर्गाबाबत सोशल मीडियावर (Social Media) काही दिशाभूल करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे. ज्या ठिकाणी कोणत्याही पोस्टमध्ये इंडियन व्हेरिअंट (Indian Varient) असा उल्लेख असेल त्या पोस्ट हटवण्याचे निर्देश सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांना दिले आहे. Covid-19 शी निगडीत बनावट बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. शुक्रवारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र लिहिलं आहे. तसंच तसंच जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या कोणत्याही रिपोर्टमध्ये इंडियन व्हेरिअंट या शब्दाला कोरोना विषाणूच्या B.1.617 च्या व्हेरिअंटसोबत जोडलं नसल्याचं पत्रात नमूद केलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे एक नोटीस जारी करण्यात आली. यामध्ये सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं माहिती शेअर केली जात असल्याचं म्हटलं आहे. यानुसार इंडियन व्हेरिअंट जगातील अन्य देशांमध्ये पसरत असल्याचं म्हटलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. या प्रकरणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १२ मे रोजी एक निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच असा कंटेन्ट जो कोरोना विषाणूला इंडियन व्हेरिअंट असं नाव देत असेल किंवा त्याचा संदर्भ अर्थ देत असेल तो कंटेन्ट त्वरित हटवण्यात यावा असं त्यांनी म्हटलं होतं. 

Web Title: India asks social media firms to remove reference to Indian variant of coronavirus Who letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.