"शेतकरी आंदोलनाशी संबंधीत 1178 पाकिस्तानी अकाऊंट्स बंद करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 01:12 PM2021-02-08T13:12:41+5:302021-02-08T13:28:29+5:30

Farmers Protest And Twitter : शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसरवणारी 1178 पाकिस्तानी ट्विटर अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत.

India asks Twitter to remove 1178 more accounts, says they are Pakistani accounts tweeting on farmer protests | "शेतकरी आंदोलनाशी संबंधीत 1178 पाकिस्तानी अकाऊंट्स बंद करा"

"शेतकरी आंदोलनाशी संबंधीत 1178 पाकिस्तानी अकाऊंट्स बंद करा"

Next

नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. याच दरम्यान भारत सरकारने ट्विटरवरून (Twitter) जवळपास 1200 ट्विटर अकाऊंट डिलीट करायला सांगितले आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसरवणारी 1178 पाकिस्तानी ट्विटर अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत. यातील अनेक अकाऊंटस हे पाकिस्तान आणि अन्य देशांमधून हँडल केले जात आहेत. मात्र, ट्विटरने अद्याप यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात 250 ट्विटर अकाउंट्स ब्लॉक करण्याचा प्रस्ताव ट्विटरकडे दिला होता. या अकाउंट्सवरुन चुकीची माहिती पसरवण्याबरोबरच किसान नरसंहार सारखे हॅशटॅगही वापरण्यात आले होते. यासंदर्भात ट्विटरला गेल्या आठवड्यात नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही मागणी केली होती की, नव्या यादीत खलिस्तान्यांप्रती सहानुभूती दाखवणारे आणि पाकिस्तानशी संबंधित अकाउंट्सचाही समावेश आहे. ज्यांचा वापर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान चुकीची सूचना देण्यासाठी करण्यात येत आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांच्या विरोधादरम्यान हे अकाउंट्स लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात, या आधारावर ते ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गाझियाबादचे भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे नेते राकेश टिकैत यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. "राकेश टिकैत हे फक्त दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात" असं गुर्जर यांनी म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. 

"राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

"मी टिकैत कुटुंबाचा आदर करतो. मात्र लोकं असं म्हणतात की, राकेश टिकैत हे दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात. असं असल्यास ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून त्यांनी असं करू नये" असं नंद किशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे. तसेच आपण स्वत:ही शेतकरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये" असा सल्ला देखील भाजपाच्या नंद किशोर गुर्जर यांनी दिला आहे. गुर्जर यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

Web Title: India asks Twitter to remove 1178 more accounts, says they are Pakistani accounts tweeting on farmer protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.