"कट्टरता अन् रक्तपातानं बनलाय पाक", UNHRCमध्ये भारतानं फोडला पाकिस्तानला घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 09:46 AM2020-06-16T09:46:34+5:302020-06-16T09:52:47+5:30
...यावर भारताने पाकिस्तानला पार उघडे पाडले. यावेळी पर्मनंट मिशन ऑफ इंडियाचे फर्स्ट सेक्रेटरी सेंथिल कुमार म्हणाले, पाकिस्तानने एकदा स्वतःच्या हृदयात डाकावून पाहावे. नरसंहार करणाऱ्या या देशाची एवढी हिंम? की त्याने दुसऱ्यावर आरोप करावेत.
जेनेवा/नवी दिल्ली :भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा पाकिस्तानचा डाव उधळून लावला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाच तोंडावर पडण्याची वेळ आली. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारताने पाकिस्तानला पार उघडे पाडले. यावेळी पर्मनंट मिशन ऑफ इंडियाचे फर्स्ट सेक्रेटरी सेंथिल कुमार म्हणाले, पाकिस्तानने एकदा स्वतःच्या हृदयात डाकावून पाहावे. नरसंहार करणाऱ्या या देशाची एवढी हिंम? की त्याने दुसऱ्यावर आरोप करावेत.
चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!
आपल्याकडे सुरू असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाकडे लक्ष द्या -
जेनेव्हामध्ये मानवाधिकार परिषदेच्या 43व्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुमार म्हणाले. “पाकिस्तानकडून मानवाधिकार परिषदेचा आणि त्यांच्या प्रक्रियेचा दुरूपयोग केला जात आहे. पाकिस्तान दक्षिण आशियाई क्षेत्रातील, असा एकमेव देश आहे, की ज्या देशाचे सरकार नरसंहार करते आणि दुसऱ्यांवर आरोप करण्याची हिंमत करते. दुसऱ्यांना सल्ला देण्यापूर्वी पाकिस्तानने आपल्या देशात मानवाधिकाराबाबत काय सुरू आहे, हे पाहावे.”
आर्टिकल 370 हटवल्याचे कुठलेही बाह्य परिणाम नाही -
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आर्टिकल 370 हटवण्यावरही कुमार यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, जम्मू काश्मीरमधून आर्टिकल 370 हटवण्याचे कोणतेही बाह्य परिणाम उमटलेले नाहीत. भारताविरोधातील अजेंडा यशस्वी होण्यासाठी पाकिस्तान आता मानवाधिकार परिषद आणि त्यांच्या प्रक्रियेचा वापर करत आहे. हे घातक आहे,” असेही कुमार यावेळी म्हणाले.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही
कट्टरता आणि रक्तपाताने बनलाय पाकिस्तान -
“ज्या देशाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तो देश आज मानवाधिकार आणि सेल्फ डिटर्मिनेशनसंदर्भात प्रश्नच कसा उपस्थित करू शकतो. हा देश धार्मिक कट्टरता आणि नरसंहाराने तयार झाला आहे. हत्या आणि सत्तापालट, अशा अनेक घटनांसाठी त्यांचा इतिहासच साक्षी आहे.” असेही कुमार म्हणाले.
CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार
अल्पसंख्यांकांविरोधत ईश-निंदा कायद्याचा गैरवापर -
“पाकिस्तानात अल्पसंख्यंकांच्या मानवाधिकाराचे उल्लंगण केले जात आहे. तेथे त्यांना घाबरवण्यासाठी ईश-निंदेसारख्या कायद्याचा गैरवापर केला जात आहे. नुकतेच सिंधमध्ये दोन हिंदू मुली, लाहोरमध्ये एक ख्रिस्ती धर्मिय मुलगी, चलेकीमध्ये अहमदी महिला आणि खैरपूरमध्ये दोन प्राध्यापकांबाबत जे घडलं, ते ईश-निंदा कायद्यांतर्गत अल्पसंख्यकांना कशा प्रकारे निशाणा बनवले जात आहे, याचेच उदारहरण आहे. 2015पासून आतापर्यंत पाकिस्तानात 56 तृतीयपंथींची हत्या करण्यात आली. या घटनाच पाकिस्ताचा खरा चेहरा समोर आणतात.” असा निशाणाही कुमार यांनी पाकिस्तानवर साधल.
कुठे गेले बलूच पश्तून लोक?
यावेळी कुमार यांनी पाकिस्तानवर आणखी एक गंभीर आरोप लावला, खैबर पख्तूनख्वामध्ये 2 हजार 500 लोक राजकीय, धार्मिक भावना आणि मानवाधिकारांचे संरक्षण करताना अचानक गायब झाले. लोकांना गायब करणे, सरकारकडून होणारा हिंसाचार आणि मोठ्या संख्येने लोकांना जबरदस्तीने विस्थापित करणे, अत्याचार करणे, न्यायबाह्य हत्या, सैन्य कारवाया, शोषण, हत्याकरून टाकून देणे, बलुचिस्तानमध्ये सैन्य शिबिरे हे कायमचेच आहे, असे कुमार म्हणाले.
चीन वाढवतोय आण्विक शस्त्रसाठा, भारतानंही कंबर कसली; जाणून घ्या, कुणाकडे किती साठा
पाकिस्तानात 47 हजार बलूच आणि 35हजार पश्तून कुठे गेले याची कोणालाही माहिती नाही. सांप्रदायिक हिंसाचाराने बलूचिस्तानमध्ये 500 हजारांचा जीव घेतला आहे. तर एक लाखहून अधिक हजारा पाकिस्तान सोडून विस्तापित झाले आहे, असेही कुमार म्हणाले.