भारताचा श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय

By admin | Published: February 12, 2016 07:20 PM2016-02-12T19:20:06+5:302016-02-12T23:02:36+5:30

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.

India beat Sri Lanka by 69 runs | भारताचा श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय

भारताचा श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय

Next

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. १२ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.
भारताने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सुरुवातीलाच श्रीलंकेला दोन धक्के बसले. फलंदाज तिलकरत्ने दिलशान शून्य धावेवर बाद झाला, तर धनुष्का गुणतिलका अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला सीकुगे प्रसन्ना सुद्धा तीन धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या संघाला मधल्या फळीतील फलंदाजानी सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. श्रीलंकेने २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. चमारा कापुगेदाराने सर्वाधिक ३२ धावा केल्या.  
भारताचा गोलंदाज आर. अश्विनने सर्वाधिक जास्त तीन बळी घेतले, तर आशिष नेहरा, जडेजा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 
भारताकडून शिखर धवनची २५ चेंडूतील ५१ धावांची अर्धशतकी खेळी, रोहित शर्माच्या ४३ धावा त्यानंतर अजिंक्य रहाणे २५, सुरेश रैना ३०, हार्दिक पंडया २७ यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या टी-२० सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.  
भारताने निर्धारित वीस षटकात सहाबाद १९६ धावा केल्या. आजच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी अवघ्या सात षटकात ७५ धावांची सलामी दिली.  
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मागच्या चूकांपासून धडा घेतल्याचे दिसून आले. नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा कर्णधार चंडीमलचा निर्णय गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. १२ षटकात भारताच्या एक बाद ११० धावा झाल्या होत्या. शानदार अर्धशतक झळकवल्यानंतर ७५ धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला.  
धवनने २५ चेंडूत ५१ धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुसरा सामना भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर होत आहे. भारताने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही. श्रीलंकेने तिल्करत्न दिलशानला संघात स्थान दिले आहे.  
ऑस्ट्रेलियातील दमदार कामगिरीमुळे भारतीय संघ श्रीलंकेच्या अनुनभवी युवा संघाला सहज नमवेल असे वाटत होते. मात्र श्रीलंकेच्या युवा वेगवान गोलंदाजांनी पुण्याच्या गवत असलेल्या खेळपट्टीचा अचूक फायदा उचलला आणि भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा दणका दिला. सध्या या मालिकेत श्रीलंका १-० ने आघाडीवर आहे. 

Web Title: India beat Sri Lanka by 69 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.