कामगारांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच भारत आत्मनिर्भर होत आहे-सोनिया गांधी

By admin | Published: May 2, 2017 12:56 AM2017-05-02T00:56:31+5:302017-05-02T00:56:31+5:30

कामगारांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच भारत आज आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन

India is becoming self reliant on the hard work of workers - Sonia Gandhi | कामगारांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच भारत आत्मनिर्भर होत आहे-सोनिया गांधी

कामगारांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच भारत आत्मनिर्भर होत आहे-सोनिया गांधी

Next

नवी दिल्ली : कामगारांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच भारत आज आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कामगार दिनाच्या शुभेच्छा संदेशातून केले आहे. ‘देशाचा कामगार हा राष्ट्रीय विकासाची चावी आहे आणि समाजाला परिपक्व आणि विकसित करण्यासाठी सहायक ठरत आहे. असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सरकारने नवे धोरण आणि चांगल्या योजना लागू केल्या पाहिजे,’ असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

परिश्रमाला मोदींचा सलाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी कामगार दिनानिमित्त देशातील कामगारांना सलाम करीत शुभेच्छा दिल्या. कामगार देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावत आहेत, असे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. ‘आज कामगार दिनानिमित्त भारताच्या विकासात मोठी भूमिका बजावणाऱ्या असंख्य कामगारांचा दृढसंकल्प आणि परिश्रमाला माझा सलाम. श्रमेव जयते,’ असे मोदींनी म्हटले आहे.

Web Title: India is becoming self reliant on the hard work of workers - Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.