रशियाकडून भारत करणार आर-27 क्षेपणास्रांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 07:36 PM2019-07-29T19:36:43+5:302019-07-29T19:37:06+5:30
रशियाकडून 1500 कोटी रुपयांची क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने करार केला आहे.
नवी दिल्ली - हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम असलेल्या आर-27 क्षेपणास्रांची खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सुमारे 1500 कोटी रुपयांची आर-27 क्षेपणास्रे खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने रशियासोबत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे. ही क्षेपणास्त्रे सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानांना जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुखोई विमानांची मारक क्षमता अधिकच वाढणार आहे.
रशियाकडून 1500 कोटी रुपयांची आर-27 क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने करार केला आहे. या क्षेपणास्रांचे वजन 253 किलो आहे. आर-27 क्षेपणास्त्रांना 60 किमीच्या रेंजपर्यंत आणि 25 किमी उंचीवर डागता येऊ शकते.
India, Russia sign Rs 1,500 crore deal for air-to-air missiles for Su-30 fighters
— ANI Digital (@ani_digital) July 29, 2019
Read @ANI Story | https://t.co/IU0S8svPCGpic.twitter.com/YNfYlsqbO0
दरम्यान, हल्लीच्या दिवसांमध्ये भारत आणि रशियामध्ये झालेला हा दुरसा मोठा करार आहे. याआधी भारताने रशियासोबत 200 कोटी रुपयांच्या अँटी टँक क्षेपणास्रांच्या करारावर सह्या केल्या होत्या. या अँटी टँक क्षेपणास्रांना एमआय-35 अटॅक चॉपरला जोडण्यात येणार आहे.