शांतता राखण्यावर भारत-चीन सहमत
By admin | Published: March 24, 2015 02:16 AM2015-03-24T02:16:19+5:302015-03-24T02:16:19+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने भारत आणि चीन यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे १८ व्या फेरीच्या चर्चेला सुरुवात केली.
नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने भारत आणि चीन यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे १८ व्या फेरीच्या चर्चेला सुरुवात केली. सीमा प्रश्न सुटण्यापूर्वी आपले मतभेद योग्यपणे आणि नियंत्रित राहून सोडविण्यास दोन्ही देश राजी झाल्याची माहिती या चर्चेनंतर चीनच्या सरकारी मीडियाने दिली.
आजच्या चर्चेबाबत भारताकडून कोणतेही अधिकृत निवेदन वा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परंतु सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यापूर्वी सीमा भागात शांतता आणि संयम कायम राखला पाहिजे, याबाबत उभय देश राजी झाल्याची माहिती शिन्हुआ या चिनी वृत्तसंस्थेने दिली. ही चर्चा उद्या मंगळवारपर्यंत सुरू राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क)