सीमारेषेवर शांततेसाठी भारत - चीन सहमत

By admin | Published: June 8, 2014 02:00 PM2014-06-08T14:00:33+5:302014-06-08T18:02:27+5:30

सीमा रेषेसंदर्भातील वाद निकाली निघेपर्यंत सीमा रेषेवर 'जैसे थे' स्थिती ठेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे.

India-China agree to peace on the border | सीमारेषेवर शांततेसाठी भारत - चीन सहमत

सीमारेषेवर शांततेसाठी भारत - चीन सहमत

Next

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि.८-  सीमा रेषेसंदर्भातील वाद निकाली निघेपर्यंत सीमा रेषेवर 'जैसे थे' स्थिती ठेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबतच्या चर्चेत हा सकारात्मक पवित्रा घेतला आहे.  
भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई हे रविवारी दोन दिवसाच्या भारत दौ-यावर आले आहेत. नवीन सरकारसोबत राजनैतिक संबंध निर्माण करुन दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रविवारी वांग ई यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेत त्यांनी सीमा रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. या भेटीत वांग ई यांनी भारतासोबत व्यापार, गुंतवणूकीवरही चर्चा केली.  मात्र सीमारेषेसंदर्भात यापूर्वीही चीनने शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका घेतली होती. मात्र यानंतरही चीनने सीमारेषेवरील कुरापती सुरुच ठेवल्या होत्या याकडे भारत - चीनसंबंधांविषयीचे जाणकार लक्ष वेधतात. 
दरम्यान, वांग ई उद्या (सोमवारी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटणार आहेत. 

Web Title: India-China agree to peace on the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.