अर्ध्यारात्री तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते 500 ड्रॅगन सैनिक, चीनने घुसखोरीचा दावा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 03:40 PM2020-08-31T15:40:57+5:302020-08-31T15:51:20+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टच्या रात्री 500 चिनी सैनिकांनी, सीमेवरील आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक येथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला.
नवी दिल्ली - भारत-चीन यांच्यात गेल्या मे महिन्यापासून सुरू असलेला तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करण्याचा प्रयत्न करत, आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टच्या रात्री 500 चिनी सैनिकांनी, सीमेवरील आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक येथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मात्र, यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांत कुठल्याही प्रकारची झटापट झाली नसल्याचेही समोर आले आहे.
चिनी परराष्ट्र मंत्रालयाने घुसखोरीचा दावा फेटाळला -
या घटनेवर चिनी परराष्ट्र मंत्रालयानेही भाष्य केले आहे. भारताने केलेला चिनी सैनिकांच्या घुसखोरीचा दावा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लवला आहे. सीमेवर असलेल्या चिनी सैनिकांनी LAC ओलांडली नाही, दोन्ही देशांत यासंदर्भात बोलणी सुरू आहे, असे चीनने म्हटले आहे.
भारताने जारी केले निवेदन -
भारत सरकारने सोमवारी सकाळी चीन सीमेवरील परिस्थितीसंदर्भात एक निवेदन जारी केले होते. यानुसार, पूर्व लडाखमध्ये पेंगाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक 29-30 ऑगस्टच्या रात्री समोरा-समोर आले होते. चिनी सैनिकांनी येथे खुसखोरीचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला.
आता या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू आहे. दोन्ही बाजूच्या कमांडर लेवलचे अधिकारी या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
याआधी 15 जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोऱ्यात जोरदार झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. तर चीनचे 35 ते 40 जवान मारले गेले होते. या झटापटीपूर्वीही भारत आणि चिनी सैन्यात अनेकदा चर्चा झाल्या. मात्र तरीही सीमेवरील तणाव कमी झालेला नाही. चिनी सैन्य पूर्व लडाखमधून मागे हटायला तयार नाही. उलट या भागात फायबर ऑप्टिक केबलचं जाळं टाकण्यास चीननं सुरुवात केली आहे. चीन आक्रमक पवित्र्यात असल्याचं सॅटेलाईट फोटोंमधूनही दिसत आहे. त्यामुळे भारतानंदेखील सीमेवरील जवानांची संख्या वाढवली आहे.
समुद्रातही चीनला भिडण्याची तयारी सुरू
भारतीय नौदलानं गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचं म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. त्यांच्या जोडीनेच भारतानेही आघाडीची युद्धनौका पाठवली आहे.
गलवान खोरं का महत्त्वाचं?
गलवान खोऱ्याचे स्वत:चे असे सामरिक महत्त्व आहे. त्यामुळे या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आटापिटा सुरू आहे. गलवान नदीच्या आसपास वसलेल्या या प्रदेशामध्ये १९६२ नंतर प्रथमच तणाव निर्माण झाला आहे. खरंतर या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची आखणी स्पष्टपणे झालेली आहे. तसेच ती दोन्ही पक्षांनी स्वीकारही केली होती. मात्र आज दोन्ही देशांचे सैन्या नियंत्रण रेषेजवळ समोरासमोर आलेले आहे.
१९६२ मध्ये चीनने भारतावर पूर्व आणि उत्तर भागातून आक्रमण केले होते. त्यात लडाखमधील भागावर हल्ला करण्याचे कारण म्हणजे चीनने शिन्जियांग प्रांत आणि तिबेटदरम्यान, एक रस्ता बांधला. जी२१९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचा सुमारे १७९ किमी भाग चीनने भारतापासून बळकावलेल्या अक्साई चीनमधून जातो. दरम्यान, हा रस्ता बांधल्यानंतर चीनने या भागावर दावा केला. तसेच १९६२ च्या युद्धात आक्रमण करून केलेल्या दाव्यापेक्षा अधिक भागावर कब्जा केला.
चीन या शिन्जियांग-तिबेट महामार्गापासून भारताला दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या देशाने या क्षेत्रातील सर्व प्रमुख दऱ्या आणि क्रेस्टलाइन्सवर आपला कब्जा दिसेल असा दावा केला. आहे. युद्धकाळात उंचावर असेल्यांना युद्धक्षेत्रात आघाडी असते. त्यामुळे भारताला उंचावरील क्षेत्रात हुकूमत प्रस्तापित करता येऊ नये असा चीनचा प्रयत्न आहे.
दरम्यान, गलवान खोऱ्यातील गलवान नदीच्या बाबतीत रिजलाईन नदीजवळून जाते. त्यामुळे श्योर रूटवरील दऱ्यांमध्ये चीनला आघाडी घेण्याची संधी मिळते. जर चीनने गलवान खोऱ्यातील संपूर्ण भागाला नियंत्रित केले नसते तर अक्साई चीनच्या पठारावर भारताला पोहोचता आले अशते. त्यामुळे चीनला धोका निर्माण झाला असता.
दरम्यान, लडाखमधील उत्तर पूर्व भागात असलेला दौलत बेग ओल्डी हा भाग भारताच्या नियंत्रणात आहे. अक्साई चीन पठारावरील भारताच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व हा भाग करतो. या भागाला जोडणारा चांगला रस्ता नसल्याने येथे विमान किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने नियंत्रणात ठेवले जात आहे. मात्र या भागात रस्त्याची बांधणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र हा रस्ता श्योक नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने हिमनग वितळल्यानंतर या रस्त्याचे नुकसान होते. श्योक नदीच्या किनाऱ्यावरून दौलत बेग ओल्डीकडे जाणारा मार्ग हा मार्ग भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण
मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य
खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार