India-China Clash: अधिवेशनात उमटले तवांग चकमकीचे पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा वॉकआउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:22 IST2022-12-14T17:20:52+5:302022-12-14T17:22:02+5:30

India-China Clash: काँग्रेस, टीएमसीसह अनेक पक्षांचे खासदार लोकसभेत भारत-चीन मुद्द्यावर चर्चेची मागणी करत होते.

India-China Clash: Consequences of Tawang Clash in loksabha; Walkout by opposition Mp's | India-China Clash: अधिवेशनात उमटले तवांग चकमकीचे पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा वॉकआउट

India-China Clash: अधिवेशनात उमटले तवांग चकमकीचे पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा वॉकआउट

Lok Sabha Session: अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग येथे भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून बुधवारी (14 डिसेंबर) लोकसभेत गदारोळ झाला. काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार आणि तृणमूल काँग्रेस (TMC) खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधक करत होते. बुधवारी प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी केली.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये लोकसभेत भारत-चीन युद्धावर चर्चा करण्यास परवानगी दिली होती. आम्ही भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी करत आहोत. 1962 मध्ये जेव्हा भारत-चीन युद्ध सुरू झाले तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी 165 खासदारांना या सभागृहात बोलण्याची संधी दिली. यानंतर आपण काय करायचे ते ठरले.

सभापती काय म्हणाले...
काँग्रेस नेत्याच्या मागणीला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि टीएमसीने निषेधार्थ वॉकआऊट केला आणि भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा होऊ न दिल्याचा आरोप सरकारवर केला. 

याआधीही खासदारांनी सभात्याग केला होता
आदल्या दिवशी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विविध मुद्यांच्या निषेधार्थ लोकसभेतून सभात्याग केला होता. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांना काही मुद्दे उपस्थित करायचे होते. यानंतर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्ससह अन्य पक्षांच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहातून सभात्याग केला. 

Web Title: India-China Clash: Consequences of Tawang Clash in loksabha; Walkout by opposition Mp's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.