भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 10:15 AM2020-06-18T10:15:15+5:302020-06-18T10:18:46+5:30
उत्तराखंडमधील चीनच्या सीमेसह संपूर्ण वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) जवानांच्या सतर्कतेत वाढ करण्यात आली आहे
नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.
उत्तराखंडमधील चीनच्या सीमेसह संपूर्ण वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) जवानांच्या सतर्कतेत वाढ करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने लष्कराचे ट्रक लडाख सीमेजवळ जाताना दिसले आहेत. चीनला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी चारही बाजुने घेरले जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर, लडाखमध्ये भारत बांधत असलेल्या रस्त्याचा वेगही वाढविण्यात आला आहे. भारताच्या या रस्ता बांधकामाला चीनचा विरोध आहे. कारण, यामुळे भारतीय लष्कराला सीमेवर जाणे सोपे होईल आणि हेच चीनला नको आहे.
सीमेवर सध्या तणाव असला तरीही रस्ता बांधकाम चालूच ठेवण्याचे भारताने ठरविले नाही, तर या कामाला आणखी गती देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यासाठी जवळपास 1500 कामगार सुद्धा लडाखला रवाना झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात काही कामगार परत आले होते, पण आता त्यांना परत पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.
आणखी बातम्या...
कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"
India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...
India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह
दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव