India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:54 AM2020-06-17T07:54:56+5:302020-06-17T07:56:01+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता.

India China Face Off: China Attacked Indian soldiers from behind after agree to stand off | India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

Next

लडाख : भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. 


गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता. मात्र, सोमवारी चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. युद्धात सारे काही माफ असते म्हणतात. मात्र, दिलेला शब्द पाळणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. मात्र, चीनने मागे हटण्याचा शब्द मोडला आणि नव्या दमाचे सैनिक घेऊन भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी परतला. 


चीनी मिडीया सीमापार युद्धाभ्यासाचे फोटो शेअर करत होता. या फोटोंद्वारे चीन जो इशारा देत होता, तोच त्याने प्रत्यक्षात आणला. भारतीय हद्दीतून मागे हटण्याची तयारी चीनने दर्शविली होती. तसा दिखावा केला आणि अचानक हल्ला केला. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीमध्ये कसे भारतीय जवान शहीद झाले. 


भारताकडून कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू चीनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी होते. ते झटापटीच्या एक तास आधीपर्यंत चीनच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते. सोमवारी सकाळी त्यांनी चीनशी चर्चा केली. त्य़ावेळी चीनने भारतीय सीमेतून मागे हटण्याचे मान्य केले.
यानंतर संतोष बाबू ५० जवानांसह स्टँड ऑफ पॉईंटची माहिती घेण्यासाठी गेले. चीनच्या सैन्याने दिलेल्या आश्वासनानुसार सैन्य माघारी परतले की पुन्हा चीनने काही दगाबाजी केली हे पाहण्यासाठी ते गेले होते. भारतीय सैन्य एलएसीवरील चीनी सैन्याने बनविलेले बेकायदेशीर घरे तोडत होती. याचवेळी चीनचे सैनिक मोठ्या संख्येने परत येऊन ठेपले. भारताचे 50 आणि चीनचे 250 सैनिक एकमेकांसमोर आले. भारतीय जवानांनी त्यांना भारतीय सीमेत जाण्यापासून रोखले. तेव्हा चीनच्या सैनिकांनी त्यांच्यावर काटेदार दांड्यांनी हल्ला केला. 


दोन्ही सैनिकांमध्ये ही झटापट गलवान नदीमध्येच होत होती. नदीचा प्रवाह वेगवान होता. यामुळेच मोठ्या प्रमाणावर सैनिकांचे जीव गेले. कारण जखमी झाल्यानंतर दोन्ही बाजुचे सैनिक पाण्याच्या प्रवाहात पडत होते. PP14 वर पोहोचण्यासाठी भारतीय जवानांना 5 ठिकाणी गलवान नदी पार करावी लागते. आधी कर्नल संतोषसह तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर भारतीय सैन्याने झीरो तापमानामध्ये असलेले सर्व जखमी सैनिक शहीद झाल्याचे सांगितले. या झटापटीत चीनचे 43 सैनिकही ठार झाले आहेत. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

Web Title: India China Face Off: China Attacked Indian soldiers from behind after agree to stand off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.