अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 03:05 PM2020-06-30T15:05:56+5:302020-06-30T15:22:29+5:30

सोमवारी मोदी सरकारमधील काही वरिष्ठ मंत्र्याची बैठक झाली. यात 5Gवर चर्चा झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री पीयूष गोयल आदी उपस्थित होते.

India china face off Chinese company may be out of 5G race Modi government ministers meeting | अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

Next
ठळक मुद्देहुवै ही भारतात 5G सेवांतील एक मुख्य दावेदार आहे.अमेरिकेत मे 2021पर्यंत हुवैच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.गेल्या वर्षीच हुवैला 5G ट्रायलमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. 

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील तणावाचा फटका आणखी एका चिनी कंपनीला बसण्याची शक्यता आहे. हुवै, असे या कंपनीचे नाव आहे. हुवै ही भारतात 5G सेवांतील एक मुख्य दावेदार आहे. भारतातील 5Gचा लिलाव सध्या एक वर्षासाठी टाळण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षीच हुवैला 5G ट्रायलमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. 

हुवैला दूर ठेवण्यासाठी अमेरिका जगभरातील सर्वच देशांवर दबाव टाकत आहे. अमेरिकेत मे 2021पर्यंत हुवैच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मोदी सरकारमधील काही वरिष्ठ मंत्र्याची बैठक झाली. यात 5Gवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री पीयूष गोयल आदी सहभागी झाले होते.

या बैठकीच्या परिणामांसंदर्भात अद्याप माहिती मुळालेली नाही. हुवैच्या संस्थापकांचे पीएलएसोबत संबंध असल्याचे बोलले जात असल्याने, भारतात या कंपनीला विरोध होत आहे. सध्याचा भारत चीन तणाव आणि देशातील बदललेले वातावरण पाहता हुवैसाठी मार्ग खडतर आहे. भारतात सुरक्षिततेच्या कारणांवरून हुवैसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.

सिंगापूरमधूनही हुवै 5Gच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. तेथे  नोकिया आणि एरिक्सनला संधी मिळाली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरक्षिततेच्या कारणांमुळे हुवै ट्रायलची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भारत सरकारदेखील हुवैवर कारवाई करू शकते, असे मानले जात आहे.

59 चिनी अॅप्स बॅन -
केंद्र सराकरने सोमवारी चीनला मोठा दणका देत, लोकप्रिय टिकटॉक अॅपसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 Aच्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.

बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ

Unlock 2 : अनलॉक-2साठी गाइडलाइन्स जारी; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय राहणार बंद

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

 

Web Title: India china face off Chinese company may be out of 5G race Modi government ministers meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.