India China Face-Off : चीनच्या कुरापती सुरूच, सीमेवर वाढवतोय सैनिकांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 06:08 PM2020-09-11T18:08:48+5:302020-09-11T19:14:36+5:30

सध्या दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्यासमोर केवळ ५०० मीटर अंतरावर आलेले आहे.

India China Face Off : despite 5 point agreement india and china seem headed towards a limited conflic | India China Face-Off : चीनच्या कुरापती सुरूच, सीमेवर वाढवतोय सैनिकांची संख्या

India China Face-Off : चीनच्या कुरापती सुरूच, सीमेवर वाढवतोय सैनिकांची संख्या

Next

नवी दिल्ली : भारत आणि चीन सैन्यांत लखाडमध्ये निर्माण झालेला तनाव आणखीन वाढत चालला आहे. भारत आणि चीनने सीमेवरील तनाव कमी करण्यासाठी सैन्याला माघार घेण्याच्या पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती दर्शविली आहे. परंतु एलएसीवर सध्याची जी परिस्थीती आहे, त्यावरून दोन्ही बाजूंकडून तनाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे चीन राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करत आहे. मात्र दुसरीकडे सीमेवर चिनी सैन्याचा मुजोरपणा सुरूच आहे. आता पँगोंग झीलच्या उत्तरेकडील  फिंगर- ३ भागात चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने सैनिकांची जमवाजमव केल्याची माहिती मिळत आहे.

रशियाची राजधानी मॉस्को येथे झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर हे त्यांच्या समकक्ष चिनी मंत्र्यांना भेटले होते. यावेळी सीमेवरच्या तणावानंतर सर्वोच्च पातळीवर झालेल्या या चर्चा होत्या. सीमेवर तणाव वाढू नये, शांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, चीनकडून तसे प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. फिंगर-४ जवळच्या उंचावरच्या जागा भारतीय सैन्याने ताब्यात घेतल्यावर चिनी सैन्याने ही जमवाजमव केली केल्याचे म्हटले जात आहे.

सध्या दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्यासमोर केवळ ५०० मीटर अंतरावर आलेले आहे. कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते एवढे स्फोटक वातावरण आहे. चिनी सैन्याकडून होऊ शकणारी संभाव्य घुसखोरी विचारात घेऊन भारतीय लष्कराकडून पँगाँग सरोवराच्या फिंगर ३ वर मोठ्या प्रमाणात जवानांची तैनाती केली जात आहे. तर चिनी सैन्यानेही गेल्या ४८ तासांत आपल्याल्या बळात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. येथून फिंगर ४ च्या दिशेने पश्चिमेकडून पुढे सरकण्याचा चीनचा डाव आहे.

लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती
लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी आणि सैन्य हटवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारत आणि चीनमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देशांतील नेत्यांनी सर्वसहमतीच्यामाध्यमातून काम केले पाहिजे. तसेच परस्परांमधील मतभेदांना विवादाचे रूप देता कामा नये, या मुद्द्यावर सहमती व्यक्त केली आहे.  

आणखी बातम्या...

- Zomato देणार गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी, पुढील वर्षात IPO ची शक्यता    

- Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट    

- मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण    

- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल     

- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका

- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"    

- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती   

Web Title: India China Face Off : despite 5 point agreement india and china seem headed towards a limited conflic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.