चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार, लडाखमध्ये लष्करासोबत 'असा' सुरू आहे हवाई दलाचा युद्ध सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:49 PM2020-06-26T15:49:00+5:302020-06-26T15:56:24+5:30

चीन सीमेवरील तणावाचा विचार करता, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) सैनिक कमी केले जाऊ शकत नाहीत. आजही गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागांत, चीनचे सैन्य पूर्वी प्रमाणेच तैनात आहे. अशा परिस्थितीत भारतही सीमेवर पूर्णपणे तयारीत आहे.

india china face off Indian army and Air force war exercise on ladakh border  | चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार, लडाखमध्ये लष्करासोबत 'असा' सुरू आहे हवाई दलाचा युद्ध सराव

चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार, लडाखमध्ये लष्करासोबत 'असा' सुरू आहे हवाई दलाचा युद्ध सराव

Next
ठळक मुद्देलडाखच्या लेह भागात भारतीय लष्कर आणि हवाई दलाचा जबरदस्त युद्धाभ्यास सुरू आहे. या युद्धाभ्यासात चिनूक हेलिकॉप्टर, मी-17 हेलिकॉप्टरदेखील भाग घेत आहेत.आजही गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागांत, चीनचे सैन्य पूर्वी प्रमाणेच तैनात आहे.

लेह :भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण असतानाच लेहमध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरू आहे. यात लढाऊ आणि मालवाहू विमानांचा समावेश होता. पायदळ आणि हवाई दल यांच्यात ताळमेळ साधणे हा या युद्धाभ्यासाचा मुख्य हेतू होता. या युद्धाभ्यासात सुखोई लढाऊ विमान आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे.

चीन सीमेवरील तणावाचा विचार करता, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) सैनिक कमी केले जाऊ शकत नाहीत. आजही गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागांत, चीनचे सैन्य पूर्वी प्रमाणेच तैनात आहे. अशा परिस्थितीत भारतही सीमेवर पूर्णपणे तयारीत आहे.

लडाखच्या लेह भागात भारतीय लष्कर आणि हवाई दलाचा जबरदस्त युद्धाभ्यास सुरू आहे. यात भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय अत्याधुनिक लढाऊ विमानेही सहभाग घेत आहेत. याशिवाय सैन्याला रसद पुरविण्यासाठी आणि सैनिकांना वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी उपयुक्त असलेले हरक्यूलिस आणि विविध प्रकारची माल वाहतुक करणारी विमानेही सहभागी होत आहेत.

या युद्धाभ्यासात चिनूक हेलिकॉप्टर, मी-17 हेलिकॉप्टरदेखील भाग घेत आहेत. युद्धाभ्यासावेळी सुखोई-30ने आकाशात संरक्षण चक्र तयार केले. यानंतर सैन्यातील मालवाहतुक करणारी विमाने रसद, तोफा आणि सैनिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासंदर्भात कोऑर्डिनेशन ऑपरेशनचा सराव करत आहेत.

लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) तणाव असताना, भारतीय लष्कर आणि हवाई दलाचा युद्धाभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. सैन्याचा असा अभ्यास येथे सात्याने सुरूच असतो, असे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याच्या युद्धाभ्यासाचा एक व्हिडिओदेखील समोर आला होता. 

चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात -
धोकेबाज चीनला 'ईट का जवाब पत्थर' से देण्यासाठी, आता भारताने शक्तिशाली टी-90 टँक्स (यालच 'भीष्म'देखील म्हणतात) विमानाच्या सहाय्याने लडाखच्या मैदानात पोहोचवले आहेत. टी-90 टँक तैनात करून भारताने चीनला जबरदस्त इशारा दिला आहे. टी-72 टँकचा एक ताफा आधिपासूनच लडाखमध्ये तैनात आहे. लद्दाखमध्ये गेल्या आठवडाभरात टी-90 टॅन्क पोहोचवण्यात आले आहेत. ते चुशूल आणि गलवान भागात तैनातही करण्यात आले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

...तर इतर रेजिमेंटचे जवान सीमेवर तंबाखू मळत होते का?; मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेनाचा हल्लाबोल

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

Web Title: india china face off Indian army and Air force war exercise on ladakh border 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.