India China Face Off: भारताचे सैनिक ताब्यात नाहीत; चीनचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 05:54 AM2020-06-20T05:54:15+5:302020-06-20T06:40:17+5:30

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन म्हणाले की, चीनने भारताच्या कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतलेले नाही. चीन आणि भारत या मुद्यावर चर्चा करीत आहेत.

India China Face Off Indian troops not in custody China clarifies | India China Face Off: भारताचे सैनिक ताब्यात नाहीत; चीनचे स्पष्टीकरण

India China Face Off: भारताचे सैनिक ताब्यात नाहीत; चीनचे स्पष्टीकरण

googlenewsNext

बीजिंग : गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीननेभारताच्या काही सैनिकांना ताब्यात घेतले आहे, असे सांगितले जात असतानाच चीनने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत आम्ही भारताच्या कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतलेले नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन म्हणाले की, चीनने भारताच्या कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतलेले नाही. चीन आणि भारत या मुद्यावर चर्चा करीत आहेत. दरम्यान, भारत आणि चीन यांनी सलग तिसऱ्या दिवशी मेजर जनरल स्तरावरील चर्चा केली. गलवान खोºयातील स्थिती सामान्य करण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची आहे.

‘लक्ष विचलित करण्याचा चीनचा प्रयत्न’
भारतीय सीमेवर चीनकडून होणाºया हालचाली म्हणजे कोरोनापासून जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे, असे मत अमेरिकेचे पूर्व आशिया विभागाचे सहायक विदेशमंत्री डेव्हिड स्टिलवेल यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे भारत-चीनमधील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. चीनच्या हालचाली या डोकलामप्रमाणेच अन्य सीमा भागांतील यापूर्वीच्या हालचालीप्रमाणेच आहेत. चीनला असेही वाटत आहे की, लोकांचे लक्ष सध्या कोरोना आणि जीव वाचविण्याकडे आहे.

Web Title: India China Face Off Indian troops not in custody China clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.