India China Face Off: पंतप्रधानांनी उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:56 AM2020-06-18T02:56:47+5:302020-06-18T02:57:07+5:30
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारत व चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजिलेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या अध्यक्षांना बोलाविण्यात आले आहे.
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारत व चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजिलेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या अध्यक्षांना बोलाविण्यात आले आहे.
गलवान खोºयाचा भाग आमचाच; चीनचा हेका कायम
बीजिंग : लडाखमधील गलवान खोºयाचा भाग आमचाच असून त्यावर दुसºया कोणाचाही हक्क नाही, असा दावा चीनने केला आहे.
43 चिनी सैनिक सोमवारी रात्री भारताबरोबर झालेल्या संघर्षात जखमी वा मृत झाले का याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी नकार दिला.
लिजियान म्हणाले की, गलवान खोºयाचा प्रश्न भारतीय व चिनी लष्कर व्यवस्थितरीत्या हाताळत आहे. आपले किती जवान शहीद झाले याची माहिती भारताने जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या जवानांबाबत काहीच माहिती दिलेली नाही. याबाबत लिजियान यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.
सीमेवरील घटना अस्वस्थ करणारी राजनाथसिंह; शहीद सैनिकांना आदरांजली
20 भारतीय जवान लडाखमधील गलवान खोºयात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात शहीद झाले. ही अत्यंत अस्वस्थ करणारी व वेदनादायी घटना आहे असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी म्हटले आहे. त्यांनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली आहे.
राजनाथसिंह यांनी का टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारतीय जवानांनी आपल्या सीमेचे रक्षण करताना, शौर्याची पराकाष्ठा केली व बलिदानही केले. भारतीय लष्कराच्या पराक्रमी परंपरेला साजेसा असाच आपल्या सैनिकांचा त्याग आहे. या सैनिकांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी व सारा देश सहभागी आहे. अतुलनीय शौर्य दाखविणाºया भारतीय सैनिकांना सलाम असेही त्यांनी म्हटले आहे.