India China Face Off: 'हे' तीन बलाढ्य देश भारताच्या ठामपणे पाठिशी; चीन पडला एकाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 06:25 AM2020-06-20T06:25:48+5:302020-06-20T06:38:17+5:30

आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत मात : लद्दाखमध्ये भारतीय लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स लढाईसाठी झाली सज्ज

India China Face Off Russia America and France supports India China fell alone | India China Face Off: 'हे' तीन बलाढ्य देश भारताच्या ठामपणे पाठिशी; चीन पडला एकाकी

India China Face Off: 'हे' तीन बलाढ्य देश भारताच्या ठामपणे पाठिशी; चीन पडला एकाकी

Next

- टेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील वाद अद्याप संपला नसला तरी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत भारतानेचीनवर मात केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून भारत करीत असलेल्या राजनैतिक चर्चेला यश आले. फ्रान्स, अमेरिका व जर्मनीने भारताची पाठराखण करीत चिनी ड्रॅगनला अप्रत्यक्ष इशारा दिला. तर चीनचे मित्रराष्ट्र असलेल्या रशियाने या प्रकरणी संयमी प्रतिक्रिया दिली. शेजारी राष्ट्रामध्ये श्रीलंका, बांगलादेश, भूतान, म्यानमारकडून अद्याप प्रतिक्रिया उमटलेली नाही.

सलग तिसºया दिवशीही गलवान खोºयात झटापट झाली त्याच ठिकाणी दोन्ही देशांच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली. एकीकडे चर्चेची तयारी दाखवून गलवानमध्ये नदीचा प्रहाव बदलण्यासाठी चीनने बुलडोझरसारखी यंत्रे आणली. चीनकडून लष्करी हालचाली वाढत असल्या तरी शुक्रवारी लेह, लद्दाखमध्ये आकाशात भारतीय लढाऊ हेलिकॉप्टर्सनी सीमा सुरक्षेची ग्वाही देशवासीयांना दिली. लष्कर स्तरावरील तीन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अजून काही दिवस चालणार असल्याने तूर्त तोडगा निघालेला नाही.

डोकलाम प्रमाणे 'जैसे थे' स्थितीवर भारत ठाम असल्याने चीनचा आक्रमकपणा बीजिंगमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आजही उमटला. सोमवारी झालेल्या झटापटीत १० भारतीय जवान चीनच्या ताब्यात असल्याचे वृत्त पसरले होते. हे जवान गुरूवारी भारतीय हद्दीत परतल्याचेही वृत्तात म्हटले होते. भारतीय लष्कराने हे वृत्त फेटाळले तर चिनी परराष्ट्र मंत्रालयानेदेखील 'आमच्या ताब्यात भारतीय सैनिक नव्हते' असे स्पष्टीकरण दिले. आपल्या जखमी, मृत जवानांचा आकडा मात्र चीन सरकारने आजही दिला नाही.

सर्व क्षेत्रात कोंडी
तंत्रज्ञान, बांधकाम, दूरसंचार क्षेत्रापाठोपाठ आता क्रीडा क्षेत्रातूनदेखील चीनविरोधात प्रतिक्रिया उमटली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळांडूंच्या किटचे प्रायोजक असलेली चिनी कंपनी लि निंगसमवेतचा करार रद्द करण्यासाठी कार्यकारी मंडळाचीबैठक बोलावणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे कोषाध्यक्ष आनंदेश्वर पांडे यांनी दिली. चीनविरोधी भावना देशात दिवसेंदिवस प्रबळ होत आहे.

स्व-रक्षणासाठी सिद्ध
कोणत्याही संकटासाठी भारतीय हवाई दलाने तयारी सुरू केली आहे. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सज्ज आहेत.
गेल्या दोन दिवस हवाई दलाचे प्रमुख आर.के.एस. भदोरिया यांनी लेह व श्रीनगरचा दौरा केला. १५ जूनला झालेल्या झटापटीनंतर भारतीय लष्करास सतर्कतेचा इशारा दिला आहे. लद्दाखमध्ये जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.
चीनचा युद्धज्वर आभासी असला व चर्चा सुरू असली तरी स्व-रक्षणासाठी सिद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ लष्करी अधिकाºयाने दिली.

पुलवामात ८ दहशतवाद्यांचा खात्मा; पाकिस्तानचे मनसुबे उद्ध्वस्त केले
चीनच्या आक्रमकपणास भारताने जशास तसे उत्तर दिल्यानंतरही काश्मीर सीमेवर पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. राजोरी जिल्ह्यात सकाळी पावणे अकरा वाजता पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला.
भारतीय जवानांनी तत्काळ उत्तर दिले. गोळीबार करून काही दहशतवाद्यांना भारतात प्रवेशासाठी मोकळा मार्ग करून देण्याचे पाकिस्तानचे मनसूबे जवानांनी उध्वस्त केले.
मात्र या चकमकीचा संदर्भ गलवान खोºयाशी नसल्याचे स्पष्टीकरण
लष्कराने दिले. शुक्रवारी ८दहशतवाद्यांना पुलमावात भारतीय जवानांनी ठार मारले. एका मशिदीत ते लपले होते.

Web Title: India China Face Off Russia America and France supports India China fell alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.