India China Face Off: नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:33 AM2020-06-22T10:33:19+5:302020-06-22T10:41:26+5:30
India China Face Off: भारतीय जवानांचं अतुलनीय शौर्य; पंजाब रेजिमेंटच्या जवानांचा पराक्रम
नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात चीन सैन्यासोबत भारतीय जवानांची झटापट झाली. सीमेवर आगळीक करणाऱ्या चिनी सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. १५ जूनच्या रात्री झालेल्या झटापटीवेळी घडलेल्या घटना आणि भारतीय जवानांचे पराक्रम आता समोर येऊ लागले आहेत. भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत चीनचे मनसुबे धुळीस मिळवले. रात्रीच्या अंधारात झालेल्या झटापटीत भारताचे काही जवान चिनी सैन्याच्या हाती लागले. त्यांची वाटाघाटीनंतर सुटका झाली. तर चीनचे काही सैनिक आणि एक अधिकारीदेखील भारताच्या ताब्यात होता.
६ जूनला झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होतेय का, हे पाहण्यासाठी भारतीय जवानांची तुकडी १५ जूनला गलवान भागात गेली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैन्यानं या भागातील पोस्ट हटवावी, असं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. मात्र चिनी सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवान संतापले आणि त्यांनी चिनी सैन्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली.
बिहार रेजिमेंट आणि पंजाब रेजिमेंटच्या जवानांनी चिनी सैन्यावर हल्ला चढवला. रात्री अंधार असल्यानं फारसा अंदाज येत नव्हता. मात्र या परिस्थितीतही शीख सैनिकांनी योग्य अंदाज घेत चिनी अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. त्या अधिकाऱ्याला थेट उचलून आणण्यात आलं. एबीपी न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पंजाब रेजिमेंटचे जवान पराक्रम गाजवत असताना बिहार रेजिमेंटचे जवानही त्यांच्या बरोबरीनं लढत होते. बिहार रेजिमेंटच्या जवानांनी अनेक चिनी जवानांच्या माना मोडल्या. बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवान चिनी सैन्यावर अक्षरश: तुटून पडले.
जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार
देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले
पंतप्रधानांनी शब्द जपून वापरावे; लडाख घुसखोरीच्या वक्तव्यावरून मनमोहन सिंगांचा सल्ला