India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 09:30 AM2020-06-23T09:30:43+5:302020-06-23T11:14:16+5:30
भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. मात्र, चीनला दोन अधिकाऱ्यांसह 40 सैनिकांना गमवावे लागले. चीनचे भारताला जबर धक्का देण्याचे कृत्य त्यांच्यावरच उलटल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तहेरांनी केला आहे.
भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे. सीमाभागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचे निर्माण करण्यासाठीही वेग आला आहे. कारण युद्धकाळात सामग्री वेगाने पोहोचविणे गरजेचे असणार आहे. चीनच्या बाजुचा भाग हा पठारी आहे तर भारतीय बाजुचा भाग हा हिमालयाच्या पर्वतरांगा असल्याने डोंगराळ आहे.
गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर चीनने काटेरी लाठ्या, दगड घेऊन हल्ला केला होता. सायंकाळी 4 वाजता सुरु झालेला हा हल्ला रात्रभर सुरु होता. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच सावध होत चीनचा हा हल्ला परतवून लावताना त्यांचे ४० सैनिक मारले होते. यावर चीनने भारतानेच पहिला हल्ला केल्याचे आरोप लावणे सुरु केले आहे. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने चीनची पोलखोल केली आहे. चीन लष्कराच्या जनरल रँकच्या अधिकाऱ्यानेच गलवानमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. यामुळे तिथे हिंसक घटना घडली, असा दावा केला आहे.
चीनचे वेस्ट थिएटर कमांडचे प्रमुख जनरल झाओ झोंग्की यांनी भारतावर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. झाओ हे भारतद्वेष्टे समजले जातात. त्यांनी या आधीही भारताविरोधात अनेकदा कारवाई केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर चीन दुबळा पडता नये. याच विचारातून भारतावर हल्ला करण्याची चाल खेळली गेली. मात्र, त्यांना वाटत होते तसे घडलेच नाही. उलट चीनच्या लष्कराचेच मोठे नुकसान झाले आहे.
चीनने गलवान घाटीमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमविली आहेत. जेव्हा भारतीय जवान चर्चा करण्यासाठी तेथे गेले तेव्हा चीनचे सैनिक दबा धरून बसलेले होते. यानंतर त्यांनी हल्ला केला. यावेळी जेव्हा भारताचे दुसरे जवान मदतीसाठी धावले तेव्हा हिंसक झटापट झाली, असा दावा अमेरिकेने केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...
India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?
India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात
फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली
...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा
शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा