Video: भारत-चीन तणावादरम्यानच सीमेजवळचा पूल तुटला, ट्रक दरीत कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 06:23 PM2020-06-22T18:23:51+5:302020-06-22T18:31:19+5:30

पिथौरागडच्या मुनस्यारी येथील धापाजवळ सेनर नाल्यावर हा पूल बांधला होता. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत

India China FaceOff: Bailey Bridge Collapse In Pithoragarh's Munsyari Amid Tension With China | Video: भारत-चीन तणावादरम्यानच सीमेजवळचा पूल तुटला, ट्रक दरीत कोसळला

Video: भारत-चीन तणावादरम्यानच सीमेजवळचा पूल तुटला, ट्रक दरीत कोसळला

Next

पिथौरागड – चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेच्या तयारीला झटका बसला आहे. उत्तराखंडच्या पिथौरागडस्थित मुनस्यारीमध्ये डावपेचाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असलेला बैली ब्रिज कोसळला आहे. ही घटना त्यावेळी घडली जेव्हा मुनस्यारी-मिलम रोडवर एक अवजड मशीन घेऊन जाण्यात येत होती. धापाच्या नजीक असलेल्या पुलावर ओव्हरलोडिंग झाल्याने ट्रकसह जेसीबी नाल्यात पडला. या घटनेत पूल पूर्णपणे तुटला आहे.

या घटनेत दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या काळात चिनी सीमेला जोडणाऱ्या मिलम रोडचं काम वेगात सुरु आहे. त्यासाठी जड मशिनरी सीमेवर पोहचवल्या जात आहेत. हा पूल कोसळल्याने आता चीन सीमेवर जाणारे आयटीबीपी आणि लष्कराच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्याचसोबत चीनला जोडणाऱ्या रस्त्याचं कामावरही त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे.

पिथौरागडच्या मुनस्यारी येथील धापाजवळ सेनर नाल्यावर हा पूल बांधला होता. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या चीनच्या सीमेला जोडणाऱ्या मिलाम रोडचे काम वेगाने सुरू आहे, त्यासाठी सीमेवर अवजड मशीन्स वाहतूक केली जात आहे. हा अपघात सोमवारी सकाळी ९.३० ते १० या दरम्यान झाला. दोन्ही जखमींवर मुनस्यारी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

२०२१ पर्यंत मुनस्यारी ते मिलाम हा रस्ता पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. ८० किमी या लांबीच्या रस्त्यात सुमारे ५५ कि.मी रस्ता डोंगर पोखरून बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित मध्य हिमालयातील सुमारे २५ किमी खडक कापण्यासाठी बीआरओने एबीसीएल कंपनीशी करार केला आहे. कंपनीने २०२१ पर्यंत रस्ता बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी अवजड मशीन्स लावून खडक कापले जात आहेत. जेथे मशीन पोहोचू शकत नाही, तेथे सैन्याच्या मालवाहू जहाजांद्वारे वाहतूक केली जात आहे. उंच हिमालयात डोंगर पोखरणे यापूर्वीच पूर्ण झाले आहे. हिमालयाच्या खालच्या भागात रस्ता बांधकाम केले जाणार आहे. येथे दगड देखील तुलनेने मजबूत आहेत.

ड्रायव्हरच्या चुकीमुळे पूल कोसळला

ड्रायव्हर पुलावर पोकलँडने भरलेला ट्रोली घेऊन जात होता. तेथे तैनात बीआरओच्या कर्मचार्‍याने ड्रायव्हरला असे करण्यापासून रोखले. हा पूल इतके वजन सहन करू शकणार नाही. तर ट्रोली आणि त्यात भरलेले पोकलँड त्यावरून जाणार नाही. पण ड्रायव्हरने कर्मचाऱ्याचे ऐकले नाही, ट्रोली घेऊन तो पुलाच्या मधोमध पोहोचताच पूल कोसळला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पक्षांतर्गत नाराजीमुळे माजी केंद्रीय मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम; शरद पवारांना धक्का

‘त्यांना’ सोडणार नाही; सुशांतच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स?

चीन संघर्षकाळात जगातील इस्लामिक देश भारताविरुद्ध उचलणार ‘हे’ घातक पाऊल?

Web Title: India China FaceOff: Bailey Bridge Collapse In Pithoragarh's Munsyari Amid Tension With China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.