India China FaceOff: मोठी बातमी! चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद; लष्कराची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 10:19 PM2020-06-16T22:19:47+5:302020-06-16T23:07:45+5:30

एलएसी येथे झालेल्या या चकमकीनंतर दिल्लीतही बैठकीची फेऱ्या सुरू झाल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ चीफ स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांची भेट घेतली.

India China FaceOff: Big News! 20 Indian soldiers martyred in conflict with China; Sources | India China FaceOff: मोठी बातमी! चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद; लष्कराची माहिती

India China FaceOff: मोठी बातमी! चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद; लष्कराची माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली – भारत आणि चीन सैनिकांमध्ये १५ आणि १६ जून रोज गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. या परिसरात तैनात असलेले  जवान जखमी झाले आहेत. त्यातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कर देशाच्या अखंडतेसाठी आणि संरक्षणासाठी कटीबद्ध आहे अशी प्रतिक्रिया भारतीय लष्काराने दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यातील जखमी झालेल्या चीनच्या सैनिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिनी हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्या आहेत.


सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पेइंचिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री लुओ झाओहुई यांनी भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांची भेट घेतली. भारतीय सूत्रांनुसार चीनच्या ४३ सैनिकांपैकी काहींचा मृत्यू तर काही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे.

यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबाबत निवेदन दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की भारताने नेहमीच एलएसीचा आदर केला आहे आणि चीननेही तसे केले पाहिजे. सोमवारी एलएसीमध्ये जे घडले ते टाळता आले असते. दोन्ही देशांचे नुकसान झाले आहे.



 

एलएसी येथे झालेल्या या चकमकीनंतर दिल्लीतही बैठकीची फेऱ्या सुरू झाल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ चीफ स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांची भेट घेतली. त्याचवेळी राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून या प्रकरणाची माहिती दिली. त्याचवेळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली.



 

Web Title: India China FaceOff: Big News! 20 Indian soldiers martyred in conflict with China; Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.