India China FaceOff: अखेर चीनने केलं मान्य! भारतासोबतच्या संघर्षात चिनी कमांडर अधिकारी गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:57 PM2020-06-22T19:57:31+5:302020-06-22T20:00:25+5:30

गलवान खोऱ्यात १५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. कर्नल संतोष बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्याने भारतीय सैनिक संतापले होते

India China FaceOff: China agreed The commander lost his officer in the conflict with India | India China FaceOff: अखेर चीनने केलं मान्य! भारतासोबतच्या संघर्षात चिनी कमांडर अधिकारी गमावला

India China FaceOff: अखेर चीनने केलं मान्य! भारतासोबतच्या संघर्षात चिनी कमांडर अधिकारी गमावला

Next
ठळक मुद्दे१५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होताबिहार रेजिमेटसोबत त्याठिकाणी पंजाब रेजिमेंटचे शिख जवानही उपस्थित होते चिनी सेनेने भारताचे १० जवान पुन्हा पाठवल्यानंतर चीनच्या अधिकाऱ्याला भारताने सोडले

नवी दिल्ली – भारत आणि चिनी सैनिकांमधील संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाले, या हिंसक घटनेनंतर भारत आणि चीन यांच्यात कमांडरस्तरीय चर्चा सुरु आहे.या हिंसक संघर्षात चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र चीनने या घटनेबद्दल कबुली दिली आहे. भारतासोबत झालेल्या संघर्षात चिनी सैन्यदलाच्या एका अधिकाऱ्याला गमावला असं सांगितले आहे.

गलवान खोऱ्यात १५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. कर्नल संतोष बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्याने भारतीय सैनिक संतापले होते, बिहार रेजिमेटसोबत त्याठिकाणी पंजाब रेजिमेंटचे शिख जवानही उपस्थित होते. त्यातील काही सैन्यांनी चिनी अधिकाऱ्याला उचलून आणले. त्यानंतर चिनी सेनेने भारताचे १० जवान पुन्हा पाठवल्यानंतर चीनच्या अधिकाऱ्याला भारताने सोडले.

ही घटना १५ जूनच्या रात्री घडली. तोपर्यंत कर्नल संतोष बाबू यांच्या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. बिहार रेजिमेंट तसेच पंजाब रेजिमेंटमधील शीख सैनिकही बदला घेण्यासाठी चिनी छावणीत घुलसे. वृत्तवाहिनी एबीपीनुसार, शीख सैनिकांनी चिनी सैनिकांवर हल्ला केला आणि नंतर एका चिनी अधिकाऱ्याला उचलले.

१५ जूनला रात्री काय घडले?

१५ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास कर्नल संतोष बाबू आणि ३५-४० सैनिक त्याच्यासमवेत गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट -१४ वर गेले. तेथे चिनी सैनिकांचा तंबू होता, चर्चेनुसार हा तंबू हटवण्याचं मान्य करण्यात आलं होतं. तंबू हटवण्यास सांगितले असता चिनी सैन्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. यानंतर भयंकर झटापट आणि काही दगडफेक करण्यात आली. या पहिल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांवर विजय मिळवला. हा संघर्ष थोड्यावेळाने शांत झाला.

भारतीय सैन्याने दुसर्‍या टीमला बोलावले

यानंतर भारतीय सैन्याच्या दुसऱ्या चमूलाही तेथे बोलावण्यात आले होते कारण चिनी सैनिक आणखी काही करु शकतात असा संशय होता दरम्यान, चिनी सैनिकांची एक मोठी टीमही तिथे आली. त्यानंतर आणखी एक रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह काही सैनिक नदीत खाली पडले. चीनमधील मोठ्या संख्येने सैनिकही गंभीर जखमी झाले आणि तेही नदीत पडले. जेव्हा हा दुसरा संघर्ष थांबला तेव्हा भारत आणि चीन या दोघांनी आपल्या सैनिकांचा शोध सुरू केला. काही सैनिक जखमी झाले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. पण कर्नल संतोष बाबू यांचा मृतदेह पाहताच सैनिक खवळले.

Web Title: India China FaceOff: China agreed The commander lost his officer in the conflict with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.