India China FaceOff: चीनने पुन्हा शब्द मोडला, पँगाँगमध्ये फिंगर तीनच्या दिशेने मोर्चा वळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 02:26 PM2020-09-11T14:26:56+5:302020-09-11T14:32:36+5:30

India China FaceOff: एकीकडे मॉस्कोमध्ये परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेत चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रवर सहमती दर्शवली. तर दुसरीकडे ही चर्चा सुरू असतानाच चिनी सैन्याना भारताच्या ताब्यातील फिंगर ३ च्या दिशेने मोर्चा वळवल्याचे समोर आले आहे.

India China FaceOff: China broke the word again, opened a front in the direction of Finger Three in Pangong | India China FaceOff: चीनने पुन्हा शब्द मोडला, पँगाँगमध्ये फिंगर तीनच्या दिशेने मोर्चा वळवला

India China FaceOff: चीनने पुन्हा शब्द मोडला, पँगाँगमध्ये फिंगर तीनच्या दिशेने मोर्चा वळवला

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्कोमध्ये चर्चा सुरू असतानाच चिनी सैन्याने केला फिंगर ३ भागात घुसखोरीचा प्रयत्नचिनी सैन्याने भारताच्या ताब्यातील फिंगर ३ च्या दिशेने मोर्चा वळवल्याचे आले समोर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणत्याही क्षणी चकमकीची ठिणगी पडू शकते एवढे स्फोटक वातावरण

लेह (लडाख) - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव अधिकच स्फोटक बनला आहे. एकीकडे मॉस्कोमध्ये परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेत चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रवर सहमती दर्शवली. तर दुसरीकडे ही चर्चा सुरू असतानाच चिनी सैन्याने भारताच्या ताब्यातील फिंगर ३ च्या दिशेने मोर्चा वळवल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी रशियामध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी चीनने पँगाँग सरोवराच्या परिसरात आगळीक केली. सूत्रांनी सांगितले की, सध्या पँगाँग सरोवरातील फिंगर ४ वर भारतीय लष्कर तैनात झाले आहे. फिंगर ४ पासून फिंगर ८ पर्यंतचे अंतर हे आठ किलोमीटर एवढे आहे. या फिंगर ८ पर्यंत भारताची हद्द आहे. मात्र सध्या चीनचे सैन्य फिंगर ८ पासून फिंगर ४ पर्यंत घुसले आहे. तसेच फिंगर २ पर्यंत आपला हद्द असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे.

सध्या दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्यासमोर केवळ ५०० मीटर अंतरावर आलेले आहे. कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते एवढे स्फोटक वातावरण आहे. चिनी सैन्याकडून होऊ शकणारी संभाव्य घुसखोरी विचारात घेऊन भारतीय लष्कराकडून पँगाँग सरोवराच्या फिंगर ३ वर मोठ्या प्रमाणात जवानांची तैनाती केली जात आहे. तर चिनी सैन्यानेही गेल्या ४८ तासांत आपल्याल्या बळात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. येथून फिंगर ४ च्या दिशेने पश्चिमेकडून पुढे सरकण्याचा चीनचा डाव आहे.

चर्चेत सहमती बनल्यानंतरही फिंगर ४ वरील रिगलाइनला चिनी सैन्याने रिकामी केलेले नाही. त्याशिाय मंगळवारी रात्री रिजच्या वरच्या भागातही चीनने सुमारे दोन हजार सैनिकांची तैनाती केली आहे. चिनी सैन्याची तुकडी येथे आल्यानंतर भारतानेही येथे आपल्या सैन्याची तैनाती केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्कर फिंगर ३ च्या टॉपवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पीएलएच्या सैनिकांनी त्या दिशेने जाण्याऱ्या वाटा अडवल्या आहेत. भारतीय जवानांनी गेल्या काही दिवसांमध्ये भारताने फिंगर ३ वर वर्चस्व मिळवण्यासाठी किमान दोन वेळा प्रयत्न केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कर पीएलएच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला असलेल्या उंच भागांवर तैनात आहे. 

लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती

 दरम्यान, लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी आणि सैन्य हटवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारत आणि चीनमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देशांतील नेत्यांनी सर्वसहमतीच्यामाध्यमातून काम केले पाहिजे. तसेच परस्परांमधील मतभेदांना विवादाचे रूप देता कामा नये, या मुद्द्यावर सहमती व्यक्त केली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

Web Title: India China FaceOff: China broke the word again, opened a front in the direction of Finger Three in Pangong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.