India China FaceOff: लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:53 PM2020-09-01T16:53:11+5:302020-09-01T16:56:13+5:30

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भाग चीनच्या ताब्यात; ड्रॅगनकडून मोठा फौजफाटा तैनात

India China FaceOff China controls 1000 square km of area in Ladakh | India China FaceOff: लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली

India China FaceOff: लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली

googlenewsNext

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य गेल्या ४ महिन्यांपासून आमनेसामने उभं ठाकलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैन्याचे मनसुबे उधळले आहेत. मात्र सीमेवरील तणाव वाढला असताना लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटरचा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली गेल्याचं वृत्त 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.

विशेष- चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं?

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भागावर आता चीनचं नियंत्रण आहे. तशी माहिती गुप्तचर विभागानं दिलेल्या इनपुट्समधून मिळाल्याचं केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिल्याचं 'द हिंदू'नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. एप्रिल-मेपासून चीन सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करत आहे. १५ जूनला पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात जोरदार झटापट झाली. यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं, तर चीनचंही मोठं नुकसान झालं. या झटापटीत चीनचे किती सैनिक शहीद याची माहिती अद्याप तिथल्या सरकारनं जाहीर केलेली नाही.

...तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी 

डेपसांगपासून ते चौशुलपर्यंत चीननं सैन्याचं प्रमाण अतिशय पद्धतशीरपणे वाढवलं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चिनी सैन्याची संख्या गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. ९०० चौरस किलोमीटर भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. गलवान खोऱ्यातील २० चौरस किलोमीटर, हॉट स्प्रिंग्समधील १२ चौरस किलोमीटर भूभागावर चीनचं नियंत्रण आहे. तर पँगाँग त्सो परिसरातील ६५ चौरस किलोमीटर, चौशुलमधील २० चौरस किलोमीटर भाग चीनच्या ताब्यात आहे. 

...अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिले

२९-३० ऑगस्टच्या रात्री काय घडलं?
पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली.  पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्यावरून चिनी सैन्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारतानं विरोध केला. चिनी सैन्याला भारतीय सैन्यानं रोखलं. त्यानंतर भारतानं या भागातील फौजफाटा वाढवला.

गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव कमी झालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र अद्यापही परिस्थितीत बदल झालेला नाही. एप्रिल पूर्वी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतलेली आहे. एका बाजूला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्रालयांच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहेत. पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याबद्दल दोन्ही देशाचं एकमत झालं आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स' म्हणजे नेमकं आहे तरी काय? ज्यांच्यामुळे भारत-चीन आले 'आमने-सामने'

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

Web Title: India China FaceOff China controls 1000 square km of area in Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.