India China FaceOff: भारताच्या ३८००० चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा अवैध कब्जा- राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 03:59 PM2020-09-17T15:59:40+5:302020-09-17T16:46:14+5:30
India China FaceOff: भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ; राजनाथ यांची ग्वाही
नवी दिल्ली: चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागातला तणाव वाढला आहे. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील तणावपूर्ण स्थितीची माहिती राज्यसभेत दिली. पूर्व लडाखमध्ये आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. सीमेवरील तणाव शांततेच्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न आहे. भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारताविरोधात चीनचा नवा डाव! सीमेवर लाऊड स्पीकर बसवून वाजवतायेत पंजाबी गाणी
चीननं भारताच्या भूमीवर अनधिकृतपणे कब्जा केल्याचं राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं. 'भारताच्या ३८ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा कब्जा आहे. १९६३ मधील एका तथाकथित सीमा कराराअंतर्गत पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधील ५ हजार १८० चौरस किलोमीटर भारतीय जमीन अवैधपणे चीनला सोपवली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जवळपास ९० हजार चौरस किलोमीटरवर चीननं दावा सांगितला आहे,' अशी माहिती राजनाथ यांनी दिली.
China continues to be in illegal occupation of approx 38,000 sq. kms in the Union Territory of Ladakh. In addition, under the so-called Sino-Pakistan 'Boundary Agreement' of 1963, Pakistan illegally ceded 5,180 sq. km. of Indian territory in PoK to China: Defence Minister in RS
— ANI (@ANI) September 17, 2020
पाच कलमी कार्यक्रम राबवा अन्यथा युद्धासाठी तयार राहा, चीनची भारताला धमकी
१५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे जवान भिडले. त्यावेळी दोन्ही सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला. त्या रात्री नेमकं काय घडलं, याची माहितीदेखील राजनाथ यांनी दिली. '१५ जूनला कर्नल संतोष बाबू यांच्यासह देशाच्या १९ शूर जवानांनी भारताच्या संरक्षणासाठी गलवान खोऱ्यात सर्वोच्च बलिदान दिलं. आपले पंतप्रधान सैन्याचं मनोधैर्य उंचावण्यासाठी लडाखला गेले,' असं राजनाथ म्हणाले.
हा कसला बहिष्कार?... 1600हून जास्त भारतीय कंपन्यांमध्ये चीनची 7500 कोटींची गुंतवणूक
भारत शांततेच्या मार्गानं प्रश्न सोडवण्यास तयार आहे. तीच भारताची भूमिका आहे. मात्र चीन औपचारिक सीमा मान्य करायला तयार नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबद्दल दोन्ही देशांमध्ये एकमत नाही. शांततेसाठी करण्यात आलेल्या करारांचं चीनकडून वारंवार उल्लंघन सुरू आहे, असं राजनाथ सिंह यांनी संसदेला सांगितलं. आम्ही देशाची मान झुकू देणार नाही. कोणीही आमच्यासमोर मान तुकवावी, हे आमचं उद्दिष्ट नाही. पण आम्हीही कोणासमोर मान झुकवणार नाही, अशा शब्दांत त्यांनी चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला.