India China FaceOff: चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:42 AM2020-06-29T10:42:30+5:302020-06-29T12:00:57+5:30
केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख राहिलेल्या एका जबाबदार व्यक्तीने हा गौप्यस्फोट केल्याने ही बाब विश्वास ठेवण्यासारखी आहे.
नवी दिल्ली : भारतीय जवानचीनच्या सैनिकांनी बांधलेले बांधकाम तोडत असताना दबा धरून बसलेल्या चीनच्या सैनिकांनी हल्ला केल्याचे सांगितले जात होते. मात्र, केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंह यांनी वेगळाच दावा केला आहे. सिंह यांच्या म्हणण्यानुसार चीनच्या सैन्याच्या तंबूंना अचानक आग लागली आणि भारतीय जवान भडकले होते.
केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख राहिलेल्या एका जबाबदार व्यक्तीने हा गौप्यस्फोट केल्याने ही बाब विश्वास ठेवण्यासारखी आहे. 15 जूनला कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू जेव्हा पेट्रोलिंग पॉईंट 14वर जाऊन पोहोचले तेव्हा चीनच्या सैनिकांनी तेथील तंबू हटविलेले नव्हते. भारतीय जवान मागे हटले की नाहीत हे पाहण्यासाठी चीनच्या सैनिकांनी तो तंबू तसाच ठेवला होता. जेव्हा दोन्ही सैनिकांनी एकमेकांना त्या जागी पाहिले तेव्हा संतोष बाबू यांनी त्यांना तो तंबू हटविण्य़ास सांगितले. चीनचे सैनिक जेव्हा तो तंबू हटवत होते तेव्हा अचानक त्या तंबूला आग लागली. यामुळे भारतीय जवान भडकले. आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की चीनने त्या तंबूमध्ये काय ठेवले होते, असा दावा व्ही के सिंह यांनी केला आहे.
ही आग लागताच दोन्ही सैन्यांमध्ये आधी बाचाबाची झाली. त्यानंतर हिंसक झटापट झाली. 1962 च्या युद्धापासून पेट्रोल पॉईंट 14 हा भारताच्या ताब्यात आहे. आता आपण श्योक नदीला लागून रस्ता बनविला आहे, जो दौलक बेग ओल्डीपर्यंत जातो. आधी जे साहित्या 15 दिवसांत तिथे पोहोचत होते ते आता केवळ 2 दिवसांत पोहोचविले जाते. चीनच्या बाजुने हा रस्ता दिसत नाही. यामुळे चीनच्या सैन्यामध्ये अस्वस्थता आहे. या रस्त्यावर नजर ठेवण्यासाठी चीनला तो पॉईंट हवा आहे. यामुळे त्यांनी यावर दावा करण्यास सुरुवात केली. चीनच्या सैनिकांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला असतान भारतीय जवानांनी त्यांना रोखले, असे सिंह यांनी सांगितले. सिंह यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केला आहे.
दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेवेळी त्या ठिकाणी 15 जूनआधी जशी परिस्थीती होती तशीच ठेवणार असल्याचे ठरले होते. म्हणजेच चिनी सैन्याला मागे हटाचे होते. एवढेच नाही तर पीपी 14, त्याच्या 2 किमी अंतर आणि 5 किमीच्या अंतरावर किती सैन्य ठेवायचे याबाबतही ठरले होते. मात्र, चीनने याचे पालन केले नसल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न
Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला
बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का
India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे
पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित
CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी