India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:47 PM2020-06-16T14:47:02+5:302020-06-16T14:53:47+5:30
सोमवारी रात्री गलवान खो-यात दोन्ही देशांच्या सैन्य अधिका-यांमध्ये चर्चा सुरू असताना ही घटना घडली.
नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखजवळच्या LACवरून वाद सुरू आहे. चिनी सैन्य आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान आज शहीद झाले. त्यानंतर लागलीच मोदी सरकारनं हालचाली वाढवल्या असून, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सेवा प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह तीन सेना प्रमुखांची बैठक घेतली आहे.
या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही उपस्थित आहेत. विशेष म्हणजे लडाख सीमेवर भारत आणि चीनमधील वाद बर्याच काळापासून सुरू आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचे अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खो-यात दोन्ही देशांच्या सैन्य अधिका-यांमध्ये चर्चा सुरू असताना ही घटना घडली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भारत-चीन सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. चीन सातत्याने असे म्हणत आहे की, हे प्रकरण चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे आहे, परंतु सैन्य माघारी घेण्यास तयार नाही. चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागेल, असे भारताने स्पष्ट केले होते. एलएसीवरील बदललेली परिस्थिती भारत कधीही स्वीकारणार नसल्याचंही मोदी सरकारनं स्पष्ट केलं होतं.
Defence Minister Rajnath Singh to also participate in Prime Minister Narendra Modi's meeting with Chief Ministers via video conference today at 3 pm.
— ANI (@ANI) June 16, 2020
तत्पूर्वी दोन्ही देशांदरम्यान असा निर्णय घेण्यात आला होता की, चिनी सैन्य गलवान व्हॅलीतील पेट्रोलिंग पॉइंट्स 14, 15 आणि 17 एपासून माघार घेईल. चिनी सैन्य श्योक नदी आणि गलवान नदीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आली होती. तीही हळू हळू माघार घेत होती, परंतु पूर्णपणे मागे हटली नव्हती. चीनी सैन्य पूर्णपणे परत जाईल, असा काल निर्णय झाला होता.
Defence Minister Rajnath Singh held a meeting with Chief of Defence Staff General Bipin Rawat, the three service chiefs and External Affairs Minister Dr S Jaishankar. Recent developments in Eastern Ladakh were discussed. pic.twitter.com/0HiE9jBdDj
— ANI (@ANI) June 16, 2020
दोन्ही देशांच्या लष्करी अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयानंतर जेव्हा चिनी सैन्याने परत जाण्यास नकार दिला, तेव्हा हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारताचे वरिष्ठ अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. चीनकडून कुठल्याही दुर्घटनेची बातमी नाही. चीन सीमेवरची परिस्थिती तणावपूर्ण आहे.