India China Faceoff: चीनला दणका! भारत देणार 'मेडिकल' धक्का; ड्रॅगनला घायाळ करण्याची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:05 AM2020-06-26T10:05:29+5:302020-06-26T10:09:37+5:30

वैदकीय क्षेत्रातील चीनवरील अवलंबित्व कमी करण्याची तयारी

India China Faceoff india planning to stop import of medical equipments from china | India China Faceoff: चीनला दणका! भारत देणार 'मेडिकल' धक्का; ड्रॅगनला घायाळ करण्याची रणनीती

India China Faceoff: चीनला दणका! भारत देणार 'मेडिकल' धक्का; ड्रॅगनला घायाळ करण्याची रणनीती

Next

नवी दिल्ली: लडाख सीमेवरील तणाव वाढला असताना भारतानं चीनची सर्व बाजूनं कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे. भारतानं सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवत चीनला प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं रणनीती तयार केली आहे. त्याचवेळी चीनकडून होणारी निर्यात कमी करण्यावरही भर दिला जात आहे. कोरोना संकटाच्या काळात चीन जगभरात वैद्यकीय साहित्याची निर्यात करत आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र चीनकडून होणारी आयात पूर्णपणे बंद करण्याची तयारी भारतानं सुरू केली आहे. 

वैद्यकीय साहित्यासाठी भारत बऱ्याच प्रमाणात चीनवर अवलंबून आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणांचा प्रामुख्यानं समावेश आहे. भारत मोठ्या प्रमाणात चीनमधून वैद्यकीय साहित्य मागवतो. यामध्ये थर्मामीटरपासून इलेक्ट्रोकार्डियोग्राफ (इसीजी) उपकरणांचा समावेश आहे. भारत जगभरातून वैद्यकीय साहित्य, उपकरणं आयात करतो. त्यातील ११ टक्के साहित्य चीनमधून येतं.

काही उपकरणांच्या बाबतीत तर भारताचं चीनवरील अवलंबित्व ८७ टक्के इतकं आहे. यामध्ये ऍक्युपंचर उपकरणं, प्रेग्नन्सी किट, क्लिनिकल थर्मामीटर आणि कपड्यांच्या साहित्याचा समावेश आहे. २०१९-२० मध्ये भारतानं ४२ हजार २४५ कोटी रुपये किमतीचं वैद्यकीय साहित्य चीनमधून आयात केलं. यातील ४ हजार ५५९ कोटी रुपयांची आयात चीनमधून झाली होती. त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातून स्वावंलबित्वासाठी योजना आखण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या ४ महिन्यांत भारतातील वैद्यकीय क्षेत्र वेगानं वाढलं आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्यांचं उत्पादन झालं आहे. आधी भारताची पीपीई किट निर्मितीची क्षमता वर्षाकाठी ६२ लाख इतकी होती. ती आता थेट २१ कोटींवर जाऊन पोहोचली आहे. आधी देशाची व्हेंटिलेटर निर्मितीची क्षमता ३ हजार ३६० इतकी होती. हा आकडा आता ३ लाख १४ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. एन-९५ मास्क तयार करण्याची क्षमताही १ कोटी ३० लाखांवरून १५ कोटींच्या पुढे गेली आहे. सरकारनं सहाय्य केल्यास चीनमधून होणारी ४ हजार कोटींची आयात थेट १ हजार कोटींवर येईल, असा दावा वैद्यकीय क्षेत्राकडून केला जात आहे.

भारताला खास मित्राचं बळ; चीनला टक्कर देण्यासाठी पाठवणार लष्कर

आता चीनची नवी घुसखोरी; गलवान खोऱ्यातही ठोकले तंबू!

ड्रॅगनचा तीळपापड! भारतीय जवानांनी चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्नच पाडला हाणून

Web Title: India China Faceoff india planning to stop import of medical equipments from china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.