India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 08:41 AM2020-07-07T08:41:58+5:302020-07-07T08:53:17+5:30
India China Faceoff : भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे
नवी दिल्ली - भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली होती. याच दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली. यानंतर आता केंद्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
भारत आणि चीनदरम्यान असलेल्या तणावानंतर भारतात गुंतवणूकीसाठी आलेल्या 50 चीनी कंपन्यांच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय झाला तर तो चीनला आणखी एक मोठा दणका असू शकतो असं म्हटलं जात आहे. देशात केंद्र सरकारने नवीन स्क्रीनिंग पॉलिसी आणली आहे. यामध्ये भारताच्या शेजारच्या देशांना भारतात कुठेही गुंतवणूक करायची असल्यास त्यांना आधी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
भारत सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा चीनला फटका बसला आहे. भारतात आता गुंतवणूक करण्यासाठी सरकारची परवानगी घेणं अनिवार्य असणार आहे. 50 चिनी कंपन्यांनी गुंतवणुकीचे प्रस्ताव दिले आहे. त्या सर्व प्रस्तावांचा फेरविचार होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. भारताने हा निर्णय घेतला गेला तर चिनी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या आधी सरकारने 59 चिनी Appsवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनचं मोठं नुकसान झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : जाणून घ्या प्राण्यांपासून किती आहे कोरोनाचा धोकाhttps://t.co/JgXBS2zR79#CoronaVirus#CoronaUpdates#COVID19Pandemic#pets#animals
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2020
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत भारतात 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. या अॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत.
CoronaVirus News : धक्कादायक! वाढदिवसाची जंगी पार्टी पडली महागात, परिसरात खळबळhttps://t.co/3h7WoybPij#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या
CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल अन्...
"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल
"भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल"
भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण