India China FaceOff: चीनचा घुसखोरीचा डाव भारताने उधळला; २० चिनी सैनिक जखमी, परिस्थिती नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 03:12 AM2021-01-26T03:12:21+5:302021-01-26T07:23:50+5:30

नाकुला येथे २० जानेवारी रोजी चिनी सैनिकांनी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत येण्याचा प्रयत्न करताच त्याला जवानांनी जोरदार विरोध केला.

India China FaceOff: India thwarts China's infiltration innings; 20 Chinese soldiers injured, situation under control | India China FaceOff: चीनचा घुसखोरीचा डाव भारताने उधळला; २० चिनी सैनिक जखमी, परिस्थिती नियंत्रणात

India China FaceOff: चीनचा घुसखोरीचा डाव भारताने उधळला; २० चिनी सैनिक जखमी, परिस्थिती नियंत्रणात

Next

नवी दिल्ली : चीनने गेल्या आठवड्यात उत्तर सिक्कीममधील नाकु ला येथे घुसखोरी करण्याचे रचलेले कारस्थान शूर भारतीय जवानांनी हाणून पाडले आहे. यावेळी झालेल्या चकमकीत २० चिनी सैनिक व चार भारतीय जवान जखमी झाले. परिस्थिती लष्कराने नियंत्रणात आणली आहे. 

यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, नाकुला येथे २० जानेवारी रोजी चिनी सैनिकांनी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत येण्याचा प्रयत्न करताच त्याला जवानांनी जोरदार विरोध केला. त्यांच्यात चकमकही झाली. हिवाळ्यात सिक्कीमसह काही राज्यांचा इतर देशांना लागून असलेला सीमाभाग हिमाच्छादित असतो. उत्तर सिक्कीममधील नाकु ला हा परिसर अतिशय दुर्गम असून तिथे व अशा सर्वच ठिकाणी भारतीय सैनिक कडक थंडीची पर्वा न करता अहोरात्र सीमेचे रक्षण करत आहेत. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला चीनच्या सैनिकांबरोबर गेल्या जोरदार चकमक झाली होती. त्यात २०हून जास्त भारतीय जवान शहीद झाले होते.

Web Title: India China FaceOff: India thwarts China's infiltration innings; 20 Chinese soldiers injured, situation under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.