चीनला करारा जवाब देण्यासाठी भारत सज्ज; LAC वर घातक IBG तैनात करणार, काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 09:28 AM2022-12-15T09:28:11+5:302022-12-15T09:28:52+5:30

सध्या भारतीय लष्कराच्या ९व्या आणि १७व्या दोन तुकड्या तीन वर्षांपासून IBG वर सराव करत आहेत

India China FaceOff: India Will Deploy Integrated Battle Groups On Lac | चीनला करारा जवाब देण्यासाठी भारत सज्ज; LAC वर घातक IBG तैनात करणार, काय आहे खास?

चीनला करारा जवाब देण्यासाठी भारत सज्ज; LAC वर घातक IBG तैनात करणार, काय आहे खास?

googlenewsNext

नवी दिल्ली - LAC वर चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर नव्या रणनीतीवर काम करत आहे. या अंतर्गत लष्कराचा IBG म्हणजेच इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप LAC वर तैनात केला जाईल. या गटात लष्कराच्या विविध फिल्डवरील तरबेज सैनिक असतील. यामध्ये पायदळ, रणगाडे, तोफगोळे, इंजिनियर्स, लॉजिस्टिक, सपोर्ट युनिटसह ते जवान असतील जे युद्धासाठी आवश्यक असतात. हा सैन्य गट अधिक घातक असेल.  त्यांना सरावाच्या माध्यमातून जास्त उंचीच्या शिखरांमध्ये युद्धासाठी तरबेज केलेले असते. 

भारतीय लष्कराच्या दोन तुकड्यांचा सराव 
सध्या भारतीय लष्कराच्या ९व्या आणि १७व्या दोन तुकड्या तीन वर्षांपासून IBG वर सराव करत आहेत. मागील वर्षी अशा इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपचं पडताळणी झाली. पडताळणीद्वारे हा लढाऊ गट अधिक प्रभावी कसे होतील याची अनेक सरावांद्वारे चाचणी केली गेली आहे. त्यानंतरच त्यांना मान्यता देण्यात आली आहे. आता आयबीजी बनवण्यासाठी सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आदेश मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत लष्कर LACवरील आपल्या नव्या रणनीतीवर काम करण्यास सुरुवात करेल.

अरुणाचलमध्ये पहिली चाचणी
अरुणाचल प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपची प्रथमच चाचणी घेण्यात आली होती. २०१९ मध्ये, भारतीय सैन्याने अरुणाचलमध्ये १५ हजार फूट उंचीवर 'हिम विजय' नावाचा सराव केला. यादरम्यान भारतीय लष्कर नव्या रणनीतीने शत्रूचा कसा मुकाबला करेल, याची चाचपणी शिखरांवर करण्यात आली. यामध्ये लष्कर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर कसे पोहोचेल, १५ हजार फूट उंचीवर असलेल्या कठीण भौगोलिक परिस्थितीत दळणवळण आणि समन्वय कसा साधेल, हे पाहण्यात आले.

इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप (IBG) ची ही पहिली चाचणी होती. IBG मध्ये ब्रिगेडला थेट कॉर्प्सकडून सूचना मिळतील. या नवीन युद्ध रणनीतीमध्ये कुणीही मध्यस्थी नसेल. यामुळे निर्णय घेणे आणि अंमलबजावणी वेगवान होईल. आयबीजीचे प्रमुख मेजर जनरल असतील. लष्कराच्या ९व्या आणि १७व्या कॉर्प्सने अनेक सरावातून IBG मध्ये प्रभुत्व मिळवले आहे. यापैकी १७ वी कॉर्प्स ही माउंटन स्ट्राइक कॉर्प्स आहे. इंटिग्रेटेड केल्याने हा ग्रुप शत्रूसाठी अधिक घातक बनतो. ज्यामध्ये सैन्याची सर्व क्षेत्रे आणि सेवा भाग घेतात. त्यात पायदळ, अभियंते, तोफखाना, हवाई संरक्षण, लष्करी विमान वाहतूक, त्यांची हल्ला करणारे हेलिकॉप्टर आणि भारतीय हवाई दलाची विमाने यांचा समावेश आहे.
 

Web Title: India China FaceOff: India Will Deploy Integrated Battle Groups On Lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.