India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 11:32 AM2020-07-07T11:32:32+5:302020-07-07T11:33:08+5:30

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे.

India China FaceOff: Indian Air Force India-China border carrying out night operations | India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

Next

नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेने मिग १९ लढाऊ विमान आणि चिनूनक हैवीलिफ्ट विमान सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर नाईट ऑपरेशन केले. गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला.

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वायूदलानेही लढाऊ विमानं सीमेजवळील एअरबेसवर तैनात केली आहे.

याबाबत ज्येष्ठ लढाऊ पायलट ग्रुप कॅप्टन ए राठी म्हणाले की, नाइट ऑपरेशन हे एखाद्या सरप्राइज सारखं असतं, ज्यामुळे वायूसेना आधुनिक प्लॅटफोर्म आणि प्रेरित सैन्याच्या मदतीने कोणत्याही वातावरणात ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित आणि तयार राहतं.

भारताच्या कठोर भूमिकेपुढे चीनने नरमाईची भूमिका घेतली. पुर्व लडाखमध्ये ज्याठिकाणी संघर्ष झाला तेथून चिनी सैन्य मागे हटण्यासाठी मान्य झालं. पण भारत चीनवर विश्वास ठेऊ इच्छित नाही त्यासाठी भारताने तयारी सुरुच ठेवली आहे.

भारताचं सामर्थ्य असलेली वायूसेना यासाठी पूर्ण ताकदीनिशी सीमेवर ऑपरेशन करत आहे. एअरफोर्सचे अपाचे अटॅक हेलिकॉप्टर सीमेवरील फॉरवर्ड एअरबेसवर ऑपरेशन करताना दिसून आलं. इतकचं नाही तर मिग २९ फायटर एअरक्राफ्ट आणि चिनूक हेवीलिफ्ट हेलिकॉप्टरही नाइट ऑपरेशनमध्ये सहभागी झालं.

दरम्यान, चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर गलवान आणि श्योक नद्यांच्या संगमावर भारताने पूल बांधण्यास सुरुवात केली. तथापि, १५ जूनचा हिंसक संघर्ष या घटनेशी संबंधित नाही. कारण ६१ वर्षापूर्वी जो करार झाला होता त्याची भारतीय सैन्याला पूर्ण माहिती होती. वास्तविक, १९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होते, त्यानंतर अनेक वर्षांपासून येथे दोन्ही सैन्यात संघर्ष झाला नाही. पण एप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला त्यावर ६१ वर्षापूर्वी  सहमती झाली होती. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची बातमी आली तेव्हा १९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या वृत्तपत्राचं शीर्षक असं होतं- 'चीन सैन्य गलवान पोस्टमधून मागे हटणार, दिल्लीच्या इशाऱ्याचा परिणाम दिसून येत असल्याचेही लिहिले गेले आहे.

2_070620102012.jpg

Web Title: India China FaceOff: Indian Air Force India-China border carrying out night operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.