India China Faceoff: मोठी बातमी! चीन पूर्व लडाखमधून माघार घेण्यास तयार; भारताला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:46 PM2020-06-23T12:46:43+5:302020-06-23T13:08:41+5:30
भारत आणि चीनमधील चर्चा सकारात्मक, सैन्य मागे घेण्यावर एकमत; लष्कराची माहिती
नवी दिल्ली: भारत आणि चिनी सैन्यात काल कमांडर स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्यावर एकमत झालं. पूर्व लडाखमध्ये वादग्रस्त जागांवरून सैन्य मागे घेण्याबद्दल चर्चा झाली असून दोन्ही बाजू याची अंमलबजावणी करतील, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या हद्दीत येणाऱ्या मोल्डो भागात ही बैठक पार पडली. तब्बल १२ तास चाललेल्या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यास चीन तयार आहे. त्यामुळे भारतही आपले जवान मागे घेईल, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
Corps Commander level talks b/w India-China y'day were held at Moldo in cordial,positive&constructive atmosphere.There was mutual consensus to disengage.Modalities for disengagement from all friction areas in Eastern Ladakh were discussed&will be taken forward by both sides: Army pic.twitter.com/WaSMfQsv4Z
— ANI (@ANI) June 23, 2020
पूर्व लडाखमध्ये ५ मेपासून दोन्ही देशांचं सैन्य आमनेसामने आल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. हा तणाव निवळण्यासाठी ६ जूनला कमांडर दर्जावरील अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यातही सीमेवरून सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला. चीननं या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे का त्याची पाहणी करण्यासाठी भारतीय सैन्य १५ जूनला गलवान भागात गेलं होतं. मात्र पोस्ट हटवण्याचं आवाहन करणाऱ्या भारतीय जवानांवर चिनी सैन्यानं हल्ला केला. भारतीय जवानांनाही चीनला चोख प्रत्युत्तर दिलं.
गलवानमधील हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. तो कमी करण्यासाठी काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. चिनी हद्दीत येणाऱ्या मोल्डोमध्ये सकाळी साडे अकरापासून लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठकीला सुरुवात झाली. बारा तास ही बैठक सुरू होती. पूर्व लडाखमध्ये तैनात सैनिक मागे घेतले जावेत आणि ५ जूनच्या आधी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशा मागण्या भारताकडून करण्यात आल्या. चीननं आपल्या सीमेवर परत जावं, असं भारताकडून स्पष्ट शब्दांत सांगण्यात आलं.
भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलं
नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं
चीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली
जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार